भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना 1 ऑगस्ट रोजी खेळला गेला. हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 200 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिका 2-1ने नावावर केली. या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला होता. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि जयदेव उनाडकट यांना संधी मिळाली होती. विशेष म्हणजे, जयदेव उनाडकट याला तब्बल 10 वर्षांनंतर वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. यावेळी त्याला वनडेत कारकीर्दीतील नवव्या विकेटसाठी 10 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली.
एका विकेटसाठी 10 वर्षांची प्रतीक्षा
खरं तर, 31 वर्षीय जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याने त्याची अखेरची वनडे विकेट 3 ऑगस्ट, 2013 रोजी झिम्बाब्वे संघाविरुद्ध बुलावायो येथे घेतली होती. ही त्याची वनडेतील 8वी विकेट होती. त्यानंतर आता त्याला तब्बल 10 वर्षांनंतर 1 ऑगस्ट, 2013 रोजी विकेट घेण्यात यश आले. अशाप्रकारे जयदेव उनाडकटने 10 वर्षांनंतर वनडेत विकेट घेतली (Jaydev Unadkat takes ODI wicket after 10 years). ही त्याची नववी विकेट ठरली.
विशेष म्हणजे, उनाडकटने अखेरचा वनडे सामना 21 नोव्हेंबर, 2013 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कोची येथे खेळला होता. एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने 6 विकेट्सने हा सामना जिंकला होता. सामन्यात उनाडकटने 6 षटके टाकताना 39 धावा खर्च केल्या होत्या. मात्र, त्याला विकेट घेण्यात यश आले नव्हते. तसेच, विंडीजविरुद्ध खेळलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने 5 षटके गोलंदाजी करताना 16 धावा खर्चून एक विकेट नावावर केली.
https://www.instagram.com/reel/CvcbJ-ZNZY4/?utm_source=ig_embed&ig_rid=353c9e44-2f5e-4249-8fff-5a2b94c4a9e6
बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
बुधवारी (दि. 2 ऑगस्ट) बीसीसीआयने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर उनाडकटचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो म्हणाला की, “खरं सांगायचं झालं, तर मी या संधीची वाट पाहत होतो आणि अखेर मला ही संधी मिळाली.” या व्हिडिओत उनाडकटला त्याच्या मागील वनडे सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील असलेल्या भारतीय खेळाडूंचीही नावे सांगण्यास सांगितले. यावेळी त्याने जरा वेळ घेत सर्व नावे व्यवस्थित सांगितली.
हा व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जयदेव उनाडकटने 10 वर्षांनंतर आपला पहिला वनडे खेळल्यानंतर आपला स्मरणशक्तीची चाचणी घेतली.”
टी20 मालिकेसाठी झाली नाही निवड
जयदेव उनाडकट याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाहीये. त्यामुळे आता विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि शार्दुल ठाकूर यांच्यासोबत तो भारतात परतणार आहे. (wi vs ind jaydev unadkat gave reaction after playing odi match 10 years)
महत्त्वाच्या बातम्या-
आफ्रिदीच्या जावयाची इंग्लंडमध्ये हवा! डेब्यू सामन्यात पहिल्या दोन चेंडूवर चटकावल्या विकेट्स, Video
टी20 मालिकेत ‘या’ 5 भारतीय धुरंधरांवर असेल आख्ख्या जगाचे लक्ष, सुपरफॉर्ममधील खेळाडूकडून विंडीजला धोका