वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने रविवारी (२४ जुलै) एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना नावावर केला. मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारताने विजय मिळवला असल्यामुळे संघ सध्या ०-२ अशा विजयी आघाडीवर आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतासाठी अक्षर पटेलने उत्कृष्ट अष्टपैलू प्रदर्शन केले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. अक्षरचे हे प्रदर्शन पाहून अनेकांनी माजी कर्णधार एमएस धोनीची आठवण आली.
वेस्ट इंडीजने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ५० षटकांमध्ये त्यांच्या ६ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या आणि ३११ धावा उभ्या केल्या. अक्षर पटेल (Axar Patel) या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी करू शकला. प्रथम गोलंदाजी करताना त्याने ९ षटकांमध्ये ४० धावा दिल्या आणि १ विकेटही घेतली. भारतासाठी अक्षर सर्वात किफायशीर गोलंदाज ठरला.
फलंदाजी करताना देखील त्याने शेवटच्या षटकांमध्ये तुफानी प्रदर्शन केले. त्याने अवघ्या ३५ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धाला ठोकल्या. शेवटच्या तीन चंडूत भारताला विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती. अशात अक्षरने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर एक जबरदस्त षटकार मारला आणि सामन्याचा शेवट केला. यापूर्वी अशी कामगिरी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने अनेकदा करून दाखवली आहे. याच कारणास्तव चाहते अक्षरची तुलना एमएस धोनीशी करत आहेत. त्याच्या प्रदर्शनानंतर भविष्यात तो रवींद्र जडेजासाठी पर्यायी खेळाडू म्हणून समोर येऊ लागला आहे. अशात जडेजाची चिंता वाढण्याची शक्यता नाकरता येणार नाही.
https://twitter.com/anilkumarjena61/status/1551334442307792896?s=20&t=3oIlijVWwpj3KAb7qeSmBw
या अप्रतिम प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. सामनावीर ठरल्यानंतर अक्षर पटेल म्हणाला की, “माझ्यासाठी ही खेळी खूप खास आहे, कारण ही संघासाठी मालिका जिंकण्याच्या कामी आली. जेव्हा मी फलंदाजीसाठी उतरलो, तेव्हा प्रत्येक षटकात १०-११ धावा करण्याचा विचार डोक्यात होता. मला वाटत होते की, आम्ही हे लक्ष्य गाठू, कारण आमच्याकडे आयपीएलचा अनुभव होता. आम्ही शांत राहण्याच्या प्रयत्नात होतो आणि रन रेट नियंत्रणात ठेवण्याकडेही आमचे लक्ष होते. कारण २०१७ नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही माझी पहिलीच मालिका होती आणि माझ्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक याच ठिकाणी आले आहे. मालिका जिंकल्यामुळे हा आनंद आधिकच वाढला.”
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर वेस्ट इंडीजने भारतासमोर विजयासाठी तब्बल ३१२ धावांची लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य ४९.४ षटकांंमध्ये गाठले. भारतासाठी संजू सॅमसन (५४) आणि श्रेयस अय्यर (६३) यांनी महत्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या १० षटकांमध्ये भारताने तब्बल १०० धावा केल्या, ज्यामध्ये अक्षर पटेलच्या योगदान महत्वाचे होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चेंडू मारायचा एकीकडे होता, पण गेला दुसरीकडे; पाहा शुबमन गिलने विचित्र पद्धतीने गमावलेली विकेट
WIvsIND: वनडे मालिका जिंकत कर्णधार धवन दिग्गजांच्या यादीत सामील; रोहितलाही न जमलेला पराक्रम नावे
अर्रर्र! वनडे मालिका जिंकूनही भारताच्या ताफ्यात निराशेची लहर, झालंय मोठं नुकसान






