वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात पहिला वनडे सामना खेळला गेला. त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. यामध्ये भारताने ३ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून देण्यात यष्टीरक्षक संजू सॅमसनचे मोठे योगदान आहे. त्याने शेवटच्या षटकात सूर मारत चौका अडवल्याने भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
यजमान संघाचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत विरोधी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या ९७ धावांच्या जोरावर भारताने ५० षटकात ७ विकेट्स गमावत ३०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाने ६ विकेट्स गमावत ३०५ धावा केल्या. यावेळी वेस्ट इंडिजला शेवटच्या षटकात विजयासाठी १५ धावा पाहिजे होत्या.
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ५०वे षटक टाकायला आला. त्याच्या गोलंदाजीवर यजमान संघाने पहिल्या ४ चेंडूत ७ धावा केल्या, तर शेवटच्या २ चेंडूत ८ धावांची आवश्यकता होती. सिराजने टाकलेला पाचवा चेंडू वाइड गेला होता. अशावेळी वाटले की तो सीमारेषेपार जाणार, याच क्षणी संजू सॅमसन (Sanju Samson) याने जबरदस्त सूर मारत चेंडू थांबवला असता वेस्ट इंडिजला एकच धाव मिळाली. त्याने जर चेंडूला थांबवला नसता तर वेस्ट इंडिजला ५ धावा मिळाल्या असत्या. त्याच्या या कौशल्याचे फोटो, व्हिडिओ ट्विटरवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. काहींनी त्याच्या उत्तम यष्टीरक्षणाचे कौतुक केले आहे.
@IamSanjuSamson मेन ऑफ दा मैच….💞
सालो बाद दूरदर्शन पर भारत के दर्शन हुए… @ddsportschannel LOVE YOU…🇮🇳💕#DDSports pic.twitter.com/dMdj76hw9L— मोहित शुक्ला گاندھیائی (@shuklaa1986) July 22, 2022
3:45am #SanjuSamson is trending again but this time for his wicket keeping ability & skills.
We believe in him, if gets proper chances he will prove his talent with bat too.
All the best for next match champ.#SanjuSamson pic.twitter.com/c9BTIqJ62w— Harshit Sarsiya (@sarsiya_harshit) July 22, 2022
https://twitter.com/Hashyzzz/status/1550650787042398214?s=20&t=55rWjeDliyBnnjq55A2rmg
या सामन्यात सॅमसनने यष्टीरक्षणात चुणूक दाखवली, मात्र फलंदाजीत तो अपयशी ठरला. त्याने १८ चेंडूत १२ धावा करत बाद झाला. तरीही त्याला दुसऱ्या सामन्यांत संधी मिळण्याची शक्यता आहे.
Sanju Samson’s stop was the difference in the end. 100% boundary. And that would’ve been Game Windies.
— Aakash Chopra (@cricketaakash) July 22, 2022
भारतीय संघात नेहमीच आत-बाहेर होणारा सॅमसन सध्या स्थिरावला असल्याचे दिसत आहे. त्याला आयर्लंड दौऱ्यातही संघात निवडले गेले होते. याच दौऱ्यात त्याने आंतरराष्ट्रीय टी२०चे पहिले अर्धशतक केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अजहरूद्दीन शेर, तर धवन सव्वाशेर, वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या वनडेत ‘गब्बर’च्या नावावर मोठा विक्रम
सचिनवर भारी पडला युवा शुबमन गिल, वेस्ट इंडीजमध्ये करून दाखवला ‘हा’ पराक्रम
९७ धावांच्या लाजवाब खेळीत धवनने केले विक्रमांचे ‘शिखर’ सर