न्यूझीलंड संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. याठिकाणी उभय संघात तीन सामन्यांची टी-२० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. बुधवारी (१० ऑगस्ट) टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान वेस्ट इंडीजला न्यूझीलंडने १३ धावांनी पराभूत केले. टी-२० मालिकेत पहिला सामना वेस्ट इंडीजने गमावला असला, तरी त्यांचा फलंदाज शिमरॉन हेटमायर याचे चांगलेच कौतुक झाले.
वेस्ट इंडीज संघ क्षेत्ररक्षण करत असताना त्यांचा २५ वर्षीय फलंदाज शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याने एक अप्रतिम झेल पकडला. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल (Martin Guptil) याचा हा झेल होता. वेस्ट इंडीजने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या डावातील ७ व्या षटकात ओडियन स्मिथ गोलंदाजी करत होता. षटकातील तिसऱ्या चेंडूवर गप्टिलला प्वाइंडच्या वरून षटकार मारायचा होता. गप्टिलला मोठा शॉट खेळला होता, पण सीमारेषेवर तैनात शिमरॉन हेटमायरने जबरदस्त झेल पकडला.
हेटमायरचे हे उत्कृष्ठ प्रदर्शन पाहून न्यूझीलंडचा सलामीवीर गप्टिल देखील हैराण झाला होता. त्याने या सामन्यात एकूण १७ चेंडू खेळले आणि एका षटाकराच्या मदतीने १६ धावा केल्या. तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १८५ धावा केल्या. सलामीसाठी आलेल्या डेवॉन कॉन्वेने ४३, तर केन विलियम्सनने ४७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. जिमी निशमने शेवटच्या १५ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३३ धावा कुटल्या.
https://twitter.com/KenAdams780/status/1557500772820074496?s=20&t=GnCzr5TeYClJLyI8OS0fmA
१८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या. शेमरह ब्रुक्स (४२), रोमारियो शेफर्ड (३१*) आणि ओडियन स्मिथ (२७*) यांनी चांगली फलंदाजी केली. दुसरीकडे न्यूझीलंडच्या विजयासाठी सर्वात महत्वाचे प्रदर्शन केले, ते म्हणजे मिचेल सॅटनरने. त्याने टाकलेल्या ४ षटकांमध्ये ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि अवघ्या १९ धावा खर्च केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंतवर उत्तराखंड सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार सन्मान
सलाम तुमच्या कामगिरीला! १९८३ च्या विश्वचषकात भारतासाठी नायक ठरलेले ‘यशपाल शर्मा’






