यूएसएमधील मेजर लीग क्रिकेट स्पर्धेतील चौथा सामना शनिवारी (दि. 15 जुलै) डलास येथे पार पडला. या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध सिएटल ऑर्कस संघ आमने-सामने होते. हा सामना सिएटल ऑर्कस संघाने 35 धावांच्या फरकाने आपल्या खिशात घातला. सिएटलने विजय मिळवला असला, तरीही संघाचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने वाहवा लुटली. चला तर, डी कॉकने नेमकं काय केलंय, हे जाणून घेऊयात…
दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) सध्या मेजर लीग क्रिकेट (Major League Cricket) स्पर्धेत भाग घेत आहे. शनिवारी त्याच्या सिएटल ऑर्कस (Seattle Orcas) संघाने सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स (San Francisco Unicorns) संघाला 35 धावांनी पराभूत केले. या सामन्यात डी कॉकने एकूण 3 झेल पकडले. मात्र, सॅन फ्रान्सिस्को संघाचा अखेरचा फलंदाज कार्मी ले रॉक्स (Carmi Le Roux) याचा झेल चर्चेत आहे.
एका षटकात पकडले 3 झेल
क्विंटन डी कॉक याने सॅन फ्रान्सिस्को संघाच्या डावातील 18व्या षटकात 3 झेल पकडले. यातील अखेरचा झेल कार्मी ले रॉक्स या फलंदाजाचा होता. कॅमरून गॅनन टाकत असलेल्या 18व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कार्मीने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू बॅटची कड घेत मागे गेला. हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाण्यापूर्वीच डी कॉकने हवेत उडी मारून एका हाताने झेलला. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
WHAT. A. TAKE!
QDK takes his THIRD CATCH 🧤of the over with this absolute SCREAMER to end the game!😱 pic.twitter.com/x8iDCcE8Od
— Major League Cricket (@MLCricket) July 16, 2023
डी कॉक 7 धावांवर तंबूत
या सामन्यात सिएटलकडून फलंदाजी करताना क्विंटन डी कॉक खास कामगिरी करू शकला नाही. सलामीला फलंदाजीसाठी उतरलेल्या डी कॉकने 6 चेंडू खेळत फक्त 7 धावा केल्या आणि तंबूचा रस्ता पकडला. त्याच्याव्यतिरिक्त सिएटल संघासाठी हेन्रीच क्लासेन चमकला. त्याने 31 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 53 धावा चोपल्या. त्यामुळे संघ पहिल्या डावात 20 षटकात 4 विकेट्स गमावत 177 धावा करू शकला. या आव्हानाचा पाठलाग करताना सॅन फ्रान्सिस्को संघालाचा डाव 17.5 षटकात 142 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना सिएटल ऑर्कस संघाने 35 धावांनी आपल्या खिशात घातला. (Wicket Keeper quinton de kock stunning catch in major cricket league see video)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी गोलंदाजाचा धक्कादायक खुलासा! म्हणाला, ‘मी सेहवागला भडकवून…’
अय्यो! ब्रॉड नाही, तर संघसहकारीच निघाला त्याच्या पत्नीचा आवडता क्रिकेटर, स्वत:च केलाय खुलासा