कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरसचा प्रकोप इतका वाढला आहे की, त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आज भारतावर आली आहे. अशामध्ये इतर खेळांप्रमाणे क्रिकेटच्या स्पर्धाही रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. येत्या २ महिन्यात क्रिकेटचा एकही सामना खेळण्यात येईल अशी काही चिन्हे दिसत नाहीत.
आशा आहे की, पुढील २ महिन्यांनंतर क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येतील. परंतु त्यावेळी क्रिकेटमध्ये अनेक बदल करावे लागतील. तसेच क्रिकेट बोर्डही (Cricket Board) आपापल्या संघांना (Teams) आणि व्यवस्थापनाला (Management) सुचना देतील.
या लेखामध्ये आपण क्रिकेटपटू आणि आयोजकांना बदल कराव्या लागणाऱ्या ३ गोष्टींचा आढावा घेणार आहोत.
१. चेंडू पॉलिशिंग-
प्रत्येक षटकात आपण गोलंदाजांना किंवा क्षेत्ररक्षकांना कसोटी क्रिकेटमध्येच नाही तर वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये चेंडूला थुंकी लावून पॉलिश करताना पाहिले आहे. यामागील कारण म्हणजे चेंडूमध्ये चमक आणणे असते. क्रिकेटपटू थुंकीबरोबरच घामानेही चेंडूला पॉलिश करतात. परंतु आता क्रिकेटपटूंना असे न करण्याच्या सूचना मिळू शकतात. कारण चेंडू मैदानातील प्रत्येक खेळाडूबरोबरच पंचांच्या हातामध्ये आणि प्रेक्षकांकडेही जात असते.
२. क्रिकेटपटूंंना मैदानावर थुंकण्यास बंदी-
क्रिकेटमध्ये सामन्यादरम्यान मैदानात थुंकणे (Spit in the field) ही सामान्य बाब आहे. परंतु आता क्रिकेट सुरु झाल्यानंतर कमीत कमी ६ महिन्यांपर्यंत क्रिकेटपटूंना असे करता येणार नाही.
३. प्रेक्षकांबरोबर सेल्फी-
क्रिकेटमध्ये चाहत्यांना आपल्या आवडत्या क्रिकेटपटूबरोबर सेल्फी (Selfie with Cricketer) काढण्याची आवड असते. त्यासाठी सामना झाल्यानंतर काही क्रिकेटपटू आपल्या चाहत्यांबरोबर फोटोही काढतात. परंतु आता क्रिकेट बोर्डांनी काही दिवसांसाठी यावर बंदी घालण्याची दाट शक्यता आहे. कारण सेल्फी घेताना क्रिकेटपटू चाहत्यांच्या खूप जवळ असतात.
लॉकडाऊनपूर्वी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील वनडे मालिकेपूर्वीही क्रिकेटपटूंना असे न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पावसामुळे पहिला सामना रद्द करावा लागला होता. यानंतर कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पहाता मालिकेतील उर्वरित दोन्हीही सामने यानंतर रद्द करण्यात आले होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज
-या कारणामुळे विराट किंवा अन्य भारतीय खेळाडूंना कुणी नडत नाही
-क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारे ३ भारतीय