---Advertisement---

सौरव गांगुलींच 20 वर्षांपूर्वीच रेकॉर्ड भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यात मोडणार का हार्दिक पांड्या?

On: शुक्रवार, मार्च 7, 2025 7:54 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy 2025) स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने छोटी पारी खेळून त्यामधून भारतीय संघाला खूप मोठा फायदा करून दिलेला आहे. आता अंतिम सामन्यात हार्दिक पांड्या(hardik pandya) सौरव गांगुली(Saurav Ganguly) यांचं 20 वर्षांपूर्वीच रेकॉर्ड मोडण्याच्या खूप जवळ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

31 वय असलेल्या हार्दिक पांड्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती आणि त्या सामन्यात गोलंदाजी मध्येही त्याला काही खास करता आले नाही. पण पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या दोन खेळाडूंना बाद केले. त्यानंतर न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 45 धावांची महत्त्वपूर्ण पारी खेळली. तसेच त्या सामन्यात त्याने एक विकेट सुद्धा घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर त्याने कमालीची खेळी केली. दुबईच्या मैदानावर षटकार चौकारांच्या मदतीने त्याने भारतीय संघाला विजयाच्या चौकटीवर आणले. त्याने 28 धावा केल्या आणि एक विकेट सुद्धा घेतली.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सगळ्यात जास्त षटकार ठोकणारा फलंदाज आत्तापर्यंत सौरव गांगुली आहेत. गांगुली यांनी 2004 मध्ये त्यांची शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळली होती. त्यांच्या नावावर 13 सामन्यात 11 डावात 665 धावा आहेत. तसेच त्या दरम्यान त्यांनी 17 षटकार ठोकले आहेत. जे की एका फलंदाजाद्वारे सगळ्यात जास्त आहेत. आता हार्दिक पांड्या हे रेकॉर्ड मोडण्याच्या खूप जवळ पोहोचला आहे.

हार्दिक पांड्याने 9 सामन्यात फक्त सहा डावात 15 षटकार ठोकले आहेत. आता फक्त तीन षटकार झळकावल्यानंतर तो गांगुली यांचं वीस वर्षांपूर्वीच रेकॉर्ड मोडू शकतो. आणि पहिल्या नंबरचा खेळाडू ठरू शकतो.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त षटकार लावणारे खेळाडू
सौरव गांगुली (भारत) 17
हार्दिक पांड्या (भारत) 15
क्रिस गेल (वेस्टइंडीज) 15
डेव्हिड मिलर (साऊथ आफ्रिका) 14
इयोन मॉर्गन (इंग्लंड) 14

भारतीय संघाने पहिला चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब 2002 मध्ये श्रीलंका सोबत खेळला होता. दोन्ही संघ संयुक्त रूपाने विजयी होते. दुसरा विजय भारतीय संघाने 2013 मध्ये मिळवला होता. आता भारतीय संघाचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे. इतिहास पाहिला तर दोन्ही संघ 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 सालामध्ये अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते, ज्यामध्ये न्युझीलंड संघाने भारतीय संघाचा पराभव करून विजय मिळवला होता.

हेही वाचा 

नेटकऱ्यांनी केली मोहम्मद शमी आणि हाशिम अमला यांची बरोबरी! यामागे नेमके कारण काय?

आत्तापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये कधी, काय झाले? जाणून घ्या टीम इंडियाचा परफॉर्मन्स

भारताविरुद्ध सौद शकीलची अर्धशतकी खेळी,पण आता या कारणाने ट्रोलर्सच्या‌ निशाण्यावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---