---Advertisement---

अबब!! २५ चेंडूत शतक, ते ही २० वर्षीय खेळाडूने केले, पहा व्हिडिओ

On: शुक्रवार, मार्च 22, 2019 7:38 PM
---Advertisement---

दुबईमध्ये टी१० क्रिकेट सामन्यात लेंकशायर विरुद्ध खेळताना सरे संघाच्या विल जॅक्सने २५ चेंडूत तुफान फटकेबाजी करत शतक ठोकले आहे. विलने ३० चेंडूत १०५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने ११ षटकार तर ८ चौकार ठोकले.

२० वर्षीय या इंग्लिश फलंदाजाने सलग ६ चेंडूंवर ६ षटकारही टोलवले आहेत. या सामन्यात त्याने फक्त १४ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर, ६२ ते ९८ धावपर्यंतचा टप्पा त्याने ६ चेंडूंवर ६ षटकार मारून पूर्ण केला. त्याच्या या शतकाबरोबरच तो टी १० क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला वाहिला फलंदाज बनला आहे.

याअगोदर टी १० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचा तडाखेबाज फलंदाज अलेक्स हेल्सच्या नावावर होता. त्याने मागील वर्षी डिसेंबरमध्ये ८७ धावांची खेळी केली होती.

जॅक्सच्या या तुफानी खेळीच्या जोरावर सरे संघाने १० षटकांत ३ विकेट्स गमावून १७६ धावा बनवल्या. १७६ धावांचा पाठलाग करताना लेंकशायर संघ १० षटकांत फक्त ८१ धावाच बनवू शकला.

हा सामना जरी अधिकृत नसला तरीही ख्रिस गेलच्या नावे असलेला जलद शतकाचा विक्रम जॅक्सने तोडला आहे. गेलने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये ३० चेंडूंत शतक ठोकले होते. तर जॅक्सने २५ चेंडूत शतक ठोकले आहे.

त्याचबरोबर या विक्रमात त्याने गेलला मागे टाकले आहे. फक्त त्याचा हा विक्रम अधिकृतरित्या विक्रमाच्या यादीत समाविष्ट करण्यात येणार नाही.

या सामन्यात सरेकडून खेळताना गेराथ बेटीने २१ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या आणि संघाला ९५ धावांनी विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

या आशियाई देशांत दिसणार नाही आयपीएल २०१९ चे थेट प्रक्षेपण..

गौतम गंभीरची नवी इंनिंग, केला या राजकीय पक्षात प्रवेश..

आयपीएल २०१३ स्पॉट फिक्सिंगवर एमएस धोनीने अखेर सोडले मौन..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment