आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवारी (26 मे) रोजी आहे. आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात आज (26 मे) रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. केकेआर संघाची धुरा श्रेयस अय्यर याच्याकडे आहे. तर हैदराबाद संघाची धुरा सांभाळताना विदेशी कर्णधार पॅट कमिन्स दिसणार आहे.
आयपीएल 2024 च्या 73 साखळीफेरी सामन्यांनंतर फायनलचं 2 संघ मिळालं आहेत. दोन्ही संघ फायनल जिंकण्यासाठी खूप मजबूत आहे. चेन्नईच्या चेपाॅक स्टेडीयमवर जर पॅट कमिन्स विजेतेपद पटकवण्यासाठी यशस्वी राहिला. तर, त्याला खूप मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात जेव्हा विदेशी कर्णधारनं ट्राॅफी जिंकली आहे. तेव्हा तो कर्णधार आस्ट्रेलियाचा होता.
कमिन्सला आज फायनल जिंकण्यासाठी यश मिळालं तर शेन वॉर्न, एडम गिलक्रिस्ट आणि डेव्हिड वॉर्नर या दिग्गज खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव समाविष्ट होणार आहे. जर कमिन्सची हैदराबाद केकेआरला पराभूत करण्यात यशस्वी राहिली. तर 8 वर्षांनंतर कोणी विदेशी कर्णधार आयपीएल ट्राॅफी जिंकेल. पॅट कमिन्स विदेशी आयपीएल विजेता म्हणून चौथा कर्णधार बनेल.
2008 ला आयपीएलचा पहिला हंगाम राजस्थान राॅयल्सनं जिंकला होता. त्यावेळी राजस्थानचा कर्णधार शेन वाॅर्न होता. त्याच्या पुढच्या हंगामात 2009 ला डेक्कन चार्जर्सनं विजेतेपद पटकावलं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू एडम गिलक्रिस्ट संघाचा कर्णधार होता. पुन्हा नवीन वर्ष 2016 ला हैदराबादनं ट्राॅफीवरती त्यांच नाव कोरलं. त्यावेळीही ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वाॅर्नर याने हैदराबादची धुरा सांभाळली होती.
ज्या विदेशी कर्णधारानं आयपीएलची ट्राॅफी जिंकली आहे. ते 3 कर्णधार ऑस्ट्रलियाचे आहेत. तर मागील 2 वर्षात कमिन्सनं ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार म्हणून खूप यश प्राप्त केलं आहे. त्याच्याकडे आज फायनल जिंकून खूप मोठा इतिहास रचण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याचा मास्टरस्ट्रोक! जर असं झालं तर नताशाला संपत्तीचा वाटा मिळणार नाही
कोलकाता नाईट रायडर्सला पुन्हा एकदा ट्रॉफी मिळवून देणार का गाैतम गंभीरचा ‘हा’ गेम प्लॅन?
फायनलपूर्वी भुवनेश्वर कुमारनं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “आता आम्ही फायनलमध्ये…”