जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 जून रोजी इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियवर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतीच भारताला इंदोर कसोटीत मात देऊन या अंतिम सामन्यासाठी आपले स्थान पक्के केले. दुसरीकडे भारताला मात्र अजूनही अंतिम सामन्यासाठी स्थान पक्के करता आले नाहीये. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात स्पर्धे पाहायला मिळत आहे. पण भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांच्या मते भारतीय संघ जवळपास अंतिम सामन्यात पोहोचलाच आहे. श्रीलंकन संग अंतिम सामन्यापर्यंत पोहचणार नाही, असा अंदाज मांजरेकरांनी व्यक्त केला.
गुरुवारी (9 मार्च) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला. मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभूत करून ऑसट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्देच्या अंतिम सामन्यात जागा पक्की केली. अशात भारताला जर अंतिम सामन्यात स्थान पक्के करायचे असेल, तर अजून एका विजयाचा गरज आहे. दुसरीकडे श्रीलंक संघाच्या प्रदर्शनावर देखील भारताचे भविष्य अपलंबून आहे. श्रीलंकन संघाने जर न्यूझीलंडलविरुद्ध गुरुवारी सुरू झालेली कसोटी मालिका जिंकली, तर भारताच्या आधी श्रीलंकन संग अंतिम सामन्यात दाखल होईल. पण जर श्रीलंकन संघाने न्यूझीलंडविरुद्धचा एक सामना अनिर्णित किंवा गमावला, तर मात्र भारताचे अंतिम सामन्यातील स्थान पक्के असेल. संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना मात्र पूर्ण विश्वास आहे की, श्रीलंकन संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकणार नाही.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यातदरम्यान संजय मांजरेकर म्हणाला की, “या कसोटीत खूपकाही होणार आहे. हे जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पोहचण्याच्या वाटेवर भारतीय संघ आहे. पण मला वाटते भारतीय संघ आधीच अंतिम सामन्यात पोहोचला आहे. पण संघाला अजून फक्त अधिकृतरित्या अंतिम सामन्यात पोहोचायचे आहे. तसेच ही मालिका देखील रोमांचक बनली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने इंदोरमध्ये अप्रतिम पुनरागमन केले होते.”
उभय संघांतील या कसोटी मालिकेचा विचार केला, तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाच दारून पराभव केला. त्यानंतर उभय संघांतील तिसऱ्या सामन्यात मात्र भारतीय संघ पराभूत झाला आणि ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत पुनरागमन करू शकला. उभय संघांतील हा चौथा सामना मालिकेचा निकाल ठरणार आहेच. पण सोबतच कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यातील दुसरा संघ देखील निश्चित करणार आहे. अहमदाबमध्ये खेळल्या जाणाऱ्या या चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवसी ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ सपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 255 धावा केल्या. यात सलामीवीर उस्मान ख्वाजा (104*) याचे शतक सामील आहे.
(Will Sri Lanka lose against New Zealand? Legend’s Predictions About WTC Finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली अभिनेते सतिश कौशिक यांना श्रद्धांजली, ट्विट करत जागवल्या आठवणी
मागच्या 10 वर्षीत एकट्या ख्वाजाने भारतात केली ‘अशी’ कामगिरी, केली श्रीलंकन दिग्गजाची बरोबरी