---Advertisement---

मुंबईकर पृथ्वी शाॅच्या जागी हा खेळा़डू दूसऱ्या कसोटीतून करणार पदार्पण?

On: शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2020 11:53 AM
---Advertisement---

29 फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्च (Christchurch) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना सुरु होणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडने भारतीय संघाला वनडे मालिकेत व्हाईटवॉश दिला होता. त्यानंतर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता.

त्यामुळे आता भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकून कसोटी मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

गुरुवारी (26 फेब्रुवारी) भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) सराव सत्रात भाग घेतला नाही. त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला संघाबरोबर सराव करता आला नाही. त्यामुळे शॉच्या या दुखापतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत शॉ ठीक होण्याची शक्यता आहे. परंतु जर तो ठीक झाला नाही, तर त्याच्याऐवजी सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला (Shubman Gill) संधी देण्याची शक्यता आहे.

गिलने गुरुवारी भारतीय संघाबरोबर सराव सत्रात भाग घेतला होता. त्यामुळे गिलला संधी दिली तर तो मयंक अगरवालसोबत (Mayank Agarwal) सलामीला फलंदाजी करू शकतो. सरावादरम्यान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) गिलबरोबर खूप चर्चा केली. यावेळी त्यांनी गिलला फुटवर्क संदर्भातही काही सल्ले दिले.

गिलने आत्तापर्यंत 2 वनडे सामने खेळले आहेत. मात्र त्याला कसोटीमध्ये 11 जणांच्या संघात आत्तापर्यंत संधी मिळालेली नाही. त्यामुळे जर त्याला उद्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संधी मिळाली तर तो कसोटीमध्ये पदार्पण करेल.

शॉने पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात अनुक्रमे 16 आणि 14 धावांची खेळी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---