Maharashtra Kesari Winners List: आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्यांची यादी

Maharashtra Kesari 2025 : अहिल्यानगरमध्ये 2 फेब्रुवारी 2025 रोजी 67वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहळने पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गदा पटकावली.
या स्पर्धेच्या आतापर्यंत एकूण 67 स्पर्धा झाल्या असून नरसिंग यादव व विजय चौधरी हे दोन ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले आहेत. स्पर्धेचे आजपर्यंतच्या सर्व विजेत्यांची यादी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आजपर्यंतची ठिकाणे व विजेते –
1961- औरंगाबाद- दिनकर दहय़ारी
1962- धुळे- भगवान मोरे
1963- सातारा- स्पर्धा रद्द
1964- अमरावती- गणपत खेडकर
1965- नाशिक- गणपत खेडकर
1966- जळगाव- दिनानाथ सिंह
1967- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ
1968- अहमदनगर- चंबा मुतनाळ
1969- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार
1970- पुणे- दादू चौगुले
1971- अलिबाग, रायगड- दादू चौगुले
1972- कोल्हापूर- लक्ष्मण वडार
1973- अकोला- लक्ष्मण वडार
1974- ठाणे- युवराज पाटील
1975- चंद्रपूर- रघुनाथ पवार
1976- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर
1977- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित
1978- मुंबई- आप्पासाहेब कदम
1979- नाशिक- शिवाजीराव पाचपुते
1980- खोपोली, रायगड- इस्माईल शेख
1981- नागपुर- बापू लोखंडे
1982- बीड- संभाजी पाटील
1983- पुणे- सरदार खुशहाल
१९८४- सांगली- नामदेव मोळे
1985- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर
1986- सोलापूर- गुलाब बर्डे
1987- नागपुर- तानाजी बनकर
1988- अहमदनगर- रावसाहेब मगर
1989- वर्धा- अनिर्णित
1990- कोल्हापूर- अनिर्णित
1991- अमरावती- अनिर्णित
1992- पुणे- आप्पालाल शेख
1993- बालेवाडी, पुणे- उदयराज जाधव
1994- अकोला- संजय पाटील
1995- नाशिक- शिवाजी केकान
1996- स्पर्धा रद्द
1997- देवळी, वर्धा- अशोक शिर्के
1998- नागपुर- गोरखनाथ सरक
1999- पुणे- धनाजी फडतरे
2000- खामगाव, बुलढाणा- विनोद चौगुले
2001- नांदेड- राहुल काळभोर
2002- जालना- मुन्नालाल शेख
2003- यवतमाळ- दत्तात्रय गायकवाड
2004- वाशी- चंद्रहास निमगिरे
2005- इंदापूर, पुणे- सईद चाउस
2006- बारामती, पुणे- अमोल बुचडे
2007- औरंगाबाद- चंद्रहार पाटील
2008- सांगली- चंद्रहार पाटील
2009- सांगवी, पुणे- विकी बनकर
2010- रोहा, रायगड- समाधान घोडके
2011- अकलूज, सोलापूर- नरसिंग यादव
2012- गोंदिया- नरसिंग यादव
2013- भोसरी- नरसिंग यादव
2014- अहमदनगर- विजय चौधरी
2015- नागपुर- विजय चौधरी
2016- वारजे, पुणे- विजय चौधरी
2017-भुगाव, पुणे- अभिजीत कटके
2018- जालना- बाला रफिक शेख
2019- बालेवाडी, पुणे- हर्षवर्धन सदगीर
2020- स्पर्धा रद्द
2021-22: सातारा- पृथ्वीराज पाटील
2022-23: पुणे- शिवराज राक्षे
2023-24: फुलगाव, पुणे- सिकंदर शेख
2024-25: अहिल्यानगर, पृथ्वीराज मोहळ
पहा आजपर्यंतच्या विजेत्यांचा व्हिडीओ: