आयपीएल २०२१ च्या लिलावापूर्वी बीसीसीआय करणार ‘या’ टी२० स्पर्धेचे आयोजन?

With Auction For IPL 2021 In Mind BCCI Likely To Conduct Syed Mushtaq Ali Trophy Ahead of Ranji Trophy In January

जगभरात थैमान माजवलेल्या कोविड-१९ चा प्रभाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच यावेळी भारताच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामावरही पडला. अशामध्ये शक्यता वर्तवली जात आहे की, आयपीएल २०२१ मधील १४ व्या हंगामाचा लिलाव लक्षात घेता बीसीसीआय जानेवारीपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत हंगामाची सुरुवात राष्ट्रीय टी२० चॅम्पियनशीपसह करू शकते.

बीसीसीआयने आधीच काही राज्य संघटनांना संकेत दिले आहेत की, ज्या राज्यात अनेक मैदाने आणि ५ स्टार हॉटेल्स आहेत, तिथे कमीत कमी ३ संघांसाठी जैव- सुरक्षित वातावरण तयार करण्यात यावे.

‘आयपीएलचा लिलाव कमीत कमी २ किंवा ३ संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे’
राज्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “हो, यावर्षी आयपीएलचा लिलाव ज्यांच्याकडे चांगले भारतीय खेळाडू नाहीत अशा कमीत कमी २ किंवा ३ संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे देशांतर्गत हंगामाची सुरुवात रणजी ट्रॉफी ऐवजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने करण्याची शक्यता आहे.”

‘१० राज्य संघटनांशी संपर्क केला जाईल’
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “कमीत कमी १० राज्य संघटनांशी संपर्क केला जाईल. सोबतच ते जैव- सुरक्षित वातावरण करू शकतात का?, हे विचारले जाईल. बीसीसीआयचे असे म्हणणे आहे की, जर १० पैकी ६ राज्य संघटनांनी सकारात्मक उत्तर दिले, तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे आयोजन दोन आठवड्यांच्या विंडोदरम्यान (कालावधीत) केले जाऊ शकते. त्यानंतर रणजी ट्रॉफी सुरू होईल.”

बंगाल क्रिकेट संघ राष्ट्रीय टी२० चॅम्पियनशीपसाठी संभावित यजमान संघटनांपैकी एक असू शकते. कारण त्यांच्याकडे ईडन गार्डन, जेयू आणि कल्याणी असे तीन स्टेडिअम आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण

“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य

आर्चर, बुमराह आणि कमिन्सपेक्षा ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक, आयपीएल गाजवणाऱ्या पडिक्कलचे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी

सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही

भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.