आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलचे हे सत्र २९ मार्चपासून सुरू होणार होते. परंतु, कोरोना महामारीमुळे लीग अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली होती.
या नव्याने आखण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे, काही फ्रॅन्चायझीच्या अडचणीत वाढ झाली आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंकेचे खेळाडू आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्यांत खेळू शकणार नाहीत.
वेगवेगळ्या देशातील खेळाडूंची वेगवेगळी कारणे आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे आपापसांत एक मालिका खेळतील जी १६ सप्टेंबर रोजी संपेल, त्यानंतर ते खेळाडू युएईमध्ये दाखल होतील. त्यानंतर क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर, हे खेळाडू संघासोबत जोडले जातील.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घातले गेले आहेत. हे निर्बंध सप्टेंबर अखेरपर्यंत असतील. ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेत लंका प्रीमियर लीग होणार आहे. त्यामुळे, श्रीलंकन खेळाडूसुद्धा उशिराने आयपीएलमध्ये भाग घेतील.
परदेशी खेळाडू उशीरा आयपीएलमध्ये दाखल झाल्यास सर्व फ्रेंचायझींवर परिणाम होईल. परंतु, असे काही संघ आहेत, ज्यांचे परदेशी खेळाडू सुरुवातीपासूनच संघात न सामील झाल्यास त्यांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागेल.
आज, त्या ५ संघांविषयी जाणून घेऊया जे विदेशी खेळाडू नसल्यास सर्वाधिक नुकसान सोसतील.
१) राजस्थान रॉयल्स
या यादीत राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स आपल्या विदेशी खेळाडूंवर खूप मोठ्या प्रमाणावर विसंबून आहे. संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा आहे. कर्णधाराव्यतिरिक्त जोफ्रा आर्चर, जोस बटलर, बेन स्टोक्स, बेन स्टोक्स, डेव्हिड मिलर, टॉम करन हे असे खेळाडू आहेत जे सुरुवातीला संघासोबत नसतील. कारण, हे सर्व खेळाडू आपापल्या देशांचे सध्या प्रतिनिधित्व करताहेत.
हे सर्व खेळाडू एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता ठेवतात. विदेशी खेळाडू नसल्यास, राजस्थानच्या संघाला विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल.
२) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये परदेशी खेळाडूंच्या आगमनास उशीर झाल्यास सर्वाधिक नुकसान होणाऱ्या संघात, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा संघ दुसर्या क्रमांकावर आहे. या फ्रेंचायझीमध्येही आघाडीच्या परदेशी खेळाडूंचा भरणा आहे.
एबी डिव्हिलियर्स हा असा खेळाडू आहे, ज्याने प्रत्येक हंगामात बंगळूरसाठी धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्सशिवाय, आरसीबीच्या संघात अॅरोन फिंच, डेल स्टेन, मोईन अली, ख्रिस मॉरिस, केन रिचर्डसन, इसरू उदाना असे खेळाडू आहेत ज्यांना संघात सामील होण्यास उशीर होऊ शकतो.
आरसीबीच्या संघात चांगल्या भारतीय खेळाडूंचा भरणा असल्याने त्यांना विदेशी खेळाडूंची तितकीशी भासणार नाही.
३) सनरायझर्स हैदराबाद
विदेशी खेळाडू उशिरा दाखल झाल्यास सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कामगिरीवर मोठा परिणाम होऊ शकतो. हैदराबादच्या संघात देखील चांगल्या विदेशी खेळाडूंचा भरणा आहे.
संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा आहे आणि सुरुवातीला तो संघात सामील होणे कठीण आहे. याशिवाय वॉर्नरचा सलामीचा जोडीदार जॉनी बेअरस्टो, मिशेल मार्श, बिली स्टेनलेक हे खेळाडू देखील पहिल्या आठवड्यात संघात सामील होऊ शकत नाहीत.
हैदराबादकडे विदेशी गोलंदाजांमध्ये पर्याय आहेत. परंतु, वॉर्नर – बेअरस्टो ही सलामीची जोडी संघासाठी खूप महत्त्वाची आहे. याच संघाच्या कामगिरीवर नक्कीच परिणाम होईल.
४) कोलकाता नाईट रायडर्स
आयपीएल २०२० च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला १५.७५ कोटी इतक्या विक्रमी किमतीला विकत घेत आपली गोलंदाजी मजबूत केली आहे.
परंतु, आता युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या सत्रात उशिरा दाखल होणाऱ्या परदेशी खेळाडूंत पॅट कमिन्सचा समावेश असेल. याशिवाय, केकेआर संघाने इयान मॉर्गनला ५ कोटी २५ लाखांच्या किंमतीत विकत घेतले आहे. तो सुद्धा इंग्लंडच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार असल्याने पहिल्या आठवड्यात आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
या दोघांव्यतिरिक्त युवा फलंदाज टॉम बॅन्टन, हा देखील इंग्लंड संघाचा कायमस्वरूपी सदस्य असल्याने, तोदेखील पहिल्या आठवड्यात संघात सामील होऊ शकत नाही.
५) किंग्स इलेव्हन पंजाब
आयपीएल २०२० स्पर्धेसाठी प्रत्येक संघ उत्साहित आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल २०२० साठी संघाचे नेतृत्व केएल राहुल याच्याकडे सोपविले आहे. तसेच, संघ व्यवस्थापनातही मोठे बदल केले गेले आहेत.
इतकेच नव्हे तर, आयपीएल २०२० च्या लिलावात पंजाबच्या फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियाच्या स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला १० कोटी ७५ लाख किंमत देऊन संघात समाविष्ट केले होते.
पण, आता सुरुवातीला मॅक्सवेल संघात सामील होणे कठीण झाले आहे. कारण, ऑस्ट्रेलियन खेळाडू १६ सप्टेंबरपर्यंत इंग्लंडबरोबर द्विपक्षीय मालिका खेळतील. त्या, ऑस्ट्रेलिया संघात मॅक्सवेलचा समावेश नक्की असणार.
मॅक्सवेलची अनुपस्थिती पंजाबसाठी मोठी हानीकारक ठरू शकते. मॅक्सवेल व्यतिरिक्त हार्दस विल्जोन आणि ख्रिस जॉर्डन हे देखील उशीराने संघात सामील होऊ शकतात.
ट्रेंडिंग लेख –
हे ५ खेळाडू जिंकू शकतात आयपीएल २०२० ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ चा पुरस्कार
४ असे वनडे सामने, जे टीम इंडियाने जिंकले केवळ १ धावेने
३ असे भारतीय खेळाडू जे आयपीएलमध्ये खेळले हे अनेकांना माहितीही नसेल…
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी: या दिवशी होणार आयपीएलचा अंतिम सामना; १० डबल हेडर्सचा असणार समावेश
१२ वर्षांनंतर अनिल कुंबळेने ‘मंकीगेट’ प्रकरणाबाबत केला मोठा खुलासा
५०० विकेट्स पूर्ण करणारा ब्रॉड घरच्या मैदानावर आहे दादा; कारणेही आहेत तशीच