मुंबई । आयपीएलची सुरूवात युएईमध्ये झाली असून काही सामने खेळले गेले. आयपीएल सुरू असताना महिला क्रिकेट स्पर्धेच्या तारीखा समोर आल्या आहेत. महिला आयपीएल 4 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 9 नोव्हेंबरला समाप्त होण्याची शक्यता आहे. यात तीन संघ खेळतील. पुरूष आयपीएलच्या प्ले-ऑफ सामन्यादरम्यान महिला आयपीएल आयोजित होण्याची चर्चा आहे.
प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, महिला आयपीएलबाबत बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितले की, ‘याला महिला टी -20 चॅलेंज असे नाव देण्यात आले आहे.’ मागील वर्षी आयपीएलदरम्यानही ही स्पर्धा खेळली गेली होती. या स्पर्धेसाठी अद्याप संघांची घोषणा झालेली नाही, परंतु ती लवकरच होऊ शकते.
आयपीएल दरम्यान होईल स्पर्धा-
आयपीएलच्या या हंगामातील लीग सामन्यांनंतर महिला टी -20 चॅलेंजचे आयोजन केले जाणार आहे. त्यावेळी पुरुष आयपीएलच्या प्ले ऑफची वेळ असेल. तथापि महिला स्पर्धेचा अंतिम सामना 9 नोव्हेंबरला आणि पुरुषांच्या आयपीएलचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होईल.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा यापूर्वीच महिला स्पर्धेबद्दल माहिती दिली आहे. महिला क्रिकेट देखील कोरोना विषाणूमुळे पूर्णपणे बंद आहे. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणारा वनडे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विशेष मालिका पाहायला मिळाल्या नाहीत. अशा परिस्थितीत त्याला टी -20 चॅलेंजमधून पुन्हा क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे.
महिला टी -20 चॅलेंज संघात कोण कोण असणार आहे आणि कर्णधार कोण होईल हे पाहावे लागेल. माजी भारतीय महिला खेळाडू नीतू डेव्हिडची बीसीसीआयने महिला संघाच्या मुख्य निवड समितीवर नियुक्ती केली आहे. नीतू डेव्हिड हे पाच सदस्यीय निवड समितीचे नेतृत्व करतील. आगामी काळात या महिला टी -20 चॅलेंजची परिस्थिती स्पष्ट होईल.