महिला टी20 विश्वचषक सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केला जात आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत महिला टी20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया चॅम्पियन ठरला होता. आता पुन्हा एकदा यूएईमध्ये टी20 विश्वविजेतेपदासाठी स्पर्धा होणार असून, त्यासाठी भारताने आपला संघ जाहीर केला आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून, यावेळीही संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. अनुभवी खेळाडू स्मृती मंधानाला उपकर्णधारपद दिले गेले. भारताला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसह अ गटात स्थान देण्यात आले आहे.
यावेळी टीम इंडियाच्या नजरा वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्यावर आहेत. त्यामुळेच काही अशा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे, जे पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळणार आहेत. दयालन हेमलता, आशा शोभना, श्रेयंका पाटील, सजना सजीवन आणि अरुंधती रेड्डी हे प्रथमच टी2O विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
दयालन हेमलता ही वरच्या फळीतील फलंदाज असून, ती 2018 पासून भारतीय महिला संघात आहे. तिला गेल्या वर्षी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नसली तरी, यावेळी निवडसमितीने तिच्यावर विश्वास ठेवला आहे. हेमलताप्रमाणेच आशा शोभनाही या वर्षी पहिला टी20 विश्वचषक खेळणार आहे. आशा शोभनाने या वर्षी वयाच्या 32 व्या वर्षी भारतासाठी वनडे पदार्पण करून इतिहास रचला होता. फक्त 2 वनडे आणि 3 टी20 सामने खेळल्यानंतर तिला प्रथमच टी20 संघात स्थान मिळाले आहे.
भारतीय अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील देखील अशा भाग्यवान खेळाडूंपैकी एक आहे, जी तिच्या पहिल्या टी20 विश्वचषकात खळबळ उडवण्यासाठी सज्ज आहे. आरसीबीसोबत गेल्या डब्लूपीएल हंगामाचे विजेतेपद जिंकणारी श्रेयंका एका वर्षापेक्षा कमी कालावधीत टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
डब्लूपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर सजीवन सजनाने यावर्षी भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. हा तिचा पहिला टी20 विश्वचषक असेल. डब्लूपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात तीने दिल्लीविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून मुंबई इंडियन्स संघाला शानदार विजय मिळवून दिला होता. वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी जरी 2018 पासून संघाचा भाग असली तरी, तिला आता पहिला टी20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा-
अविश्वसनीय! 137 चेंडू खेळूनही उघडले नाही खाते, इंग्लंडच्या फलंदाजाची खेळी ठरली चर्चेचा विषय
घटस्फोटानंतर नताशाने सांगितला प्रेमाचा अर्थ; म्हणाली, “प्रेम कधी अपमान करत…”
Duleep Trophy 2024: रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज स्पर्धेतून बाहेर; मोठे कारण समोर