टोकियो ऑलिम्पिक २०२० च्या दहाव्या दिवशी भारतीय महिला थाळीफेकपटू कमलप्रित कौर हिने अंतिम फेरीत भारताचे आव्हान सादर केले. मुख्य ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेमध्ये कमलप्रित सहाव्या क्रमांकावर राहिली. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कृष्णा पुनियाने केलेल्या विक्रमाची तिने बरोबरी केली. महिला थाळीफेक प्रकारातील सुवर्णपदक अमेरिकेच्या वॅलेरी ऑलमनने आपल्या नावे केले.
अशी राहिली कमलप्रितची कामगिरी
ऑलिम्पिकमध्ये थाळीफेक प्रकारात अंतिम फेरी गाठणारी दुसरी महिला खेळाडू ठरलेल्या कमलप्रितने या अंतिम फेरीत एकूण १२ खेळाडूंपैकी नवव्या क्रमांकावरून सुरुवात केली. तिने आपल्या पहिल्या संधीमध्ये ६१.६२ मीटर लांबीची फेक केली. दुसऱ्या संधीमध्ये तिला योग्यरीतीने थाळी फेकता न आल्याने ही संधी पकडली गेली नाही. तिसऱ्या संधीमध्ये आणखी चांगली कामगिरी करत ६३.७० थाळी फेकत सहावे स्थान पटकावून स्वत:ला पदकाच्या शर्यतीत कायम ठेवले.
प्रत्येकी तीन प्रयत्नानंतर अखेरच्या चार खेळाडूंना बाहेर काढले जाते व उर्वरित आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातात. मात्र, अंतिम निर्णय सहापैकी सर्वोत्तम फेकीनुसारच होतो.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Athletics
Women's Discus Throw Finals ResultsA trailblazing show by #KamaljeetKaur!👏🙌🥏🇮🇳
Bows out of medal race, finishing 6th with the best throw of 63.70 – our best-ever finish at the #OlympicGames #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/4MGSMr9jYu— Team India (@WeAreTeamIndia) August 2, 2021
टॉप एटमध्ये केली चांगली कामगिरी
पात्रता फेरीतून पुढे आलेल्या १२ खेळाडूंमधून अखेरच्या ८ खेळाडूंमध्ये आलेली कमलप्रित चौथ्या संधीमध्ये अचूक फेक करण्यात अपयशी ठरली. पाचव्या प्रयत्नातही ती आपली सर्वोत्तम कामगिरी गाठण्यात यशस्वी ठरली नाही व केवळ ६१.३७ मीटर थाळी फेकू शकली. सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नही ती योग्यरीतीने थाळी फेकली नाही व सहाव्या क्रमांकावर तिने स्पर्धा समाप्त केली.
या खेळाडूंनी नावे केली पदके
अमेरिकेची वॅलेरी ऑलमन हिने ६८.९८ मीटर थाळी फेकत सुवर्णपदक पटकावले. ६६.८६ मीटर खाली फेकत जर्मनीच्या क्रिस्टेन पुडेन्जने रौप्यपदक कमावले. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या क्युबाच्या येमी पेरेझने ६५.७२ मीटर थाळी फेकत कांस्यपदक आपल्या नावे केले. क्रोएशियाची दोन वेळेची ऑलिम्पिक सुवर्ण विजेती सॅन्ड्रा पेरकोविच चौथ्या स्थानी राहिली.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: भारतीय महिला हॉकी संघाने केलेला ‘तो’ ऐतिहासिक गोल, ज्यामुळे पहिल्यांदाच उघडले सेमीफायनलचे दार
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी ‘या’ खेळाडूंना मिळू शकते भारताच्या ‘प्लेइंग ११’मध्ये खेळण्याची संधी