इंग्लंड संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघांतील तीन सामन्यांची टी-20 मालिका रविवारी (12 मार्च) यजमान बांगलादेश संघाने नावावर केली. मालिकेतील एक सामना शिल्लक असतानाच बांगलादेशने विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाला पराभवाचे पाणी वाजले आहे. या पराभवानंतर इंग्लंड संघावर सर्वत्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मालिकेतील दुसरा सामना बांगलादेशने 4 विकेट्सच्या अंतराने नावावर केला.
तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी इंग्लंड संघ बांगलादेश दौऱ्यावर आला. पाहुण्या संघाने वनडे मालिकेत यजमान बांगलादेशला मात दिली, पण टी-20 मालिकेत मात्र इंग्लंड संघ हतबल झाल्याचे दिसले. बांगलादेशने या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना नावावर करत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्या नेतृत्वात खेळताना मेहदी हसन मिराज (Mehidy Hasan Miraz) याने संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले. मेहदी हसनच्या या प्रदर्शनाच्या जोरावर बांगलादेशचा विजय सोपा झाला. बांगलादेशला विजयासाठी 118 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्या त्यांनी 6 बाद 18.5 षटकात गाठले.
तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. कर्णधार शाकिबचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. बांगलादेशच्या तब्बल आठ खेळाडूंनी या सामन्यात गोलंदाजी केली. परिणामी इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. एकाही फलंदाजाने अर्धशतक किंवा समाधानकारक कामगिरी केली नसल्याने इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 117 धावांवर गुंडाळला गेला. मेहदी हसन याने इंग्लंडचा सर्वात जास्त म्हणजेच चार विकेट्स घेतल्या. तस्किन अहमद, मुस्तफिझूर रहीम, शाकिब अल हसन आणि हसन मेहमूद यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. इंग्लंडसाठी सलामीवीर फिल साल्ट याने 25, तर मध्यक्रमांत बेन डकेत याने 28 धावांची सर्वोत्तम खेळी केली.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेश फलंदाजीला आल्यानंतर लिटन दास आणि रॉनी टालूकदार या सलामीवीरांनी प्रत्येक 9-9 धावा करून विकेट गमावली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला नाजमूल हुसैन शांटो याने सर्वाधिक 46 धावा केल्या. बांगलादेशप्रमाणे इंग्लंडकडूनही कसलेली गोलंदाजी करण्यात आली. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने 4 षटकात अवघ्या 13 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. सॅम करन, मोईन अली आणि रिहान अहमद यांनी प्रत्येकी एक-एक विकेट नाववर केली. (World champion England lost to Bangladesh in T20 series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथा दिवस विराटचाच! कोहलीच्या दर्जा शतकाने वाढली टीम इंडियाच्या विजयाची संधी, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
विराटचे द्विशतक हुकले, पण बनला WTCच्या इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय, कर्णधार रोहितचा विक्रम मोडला




टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा