---Advertisement---

पाकिस्तानच्या पराभवानंतर चिडला हरभजन सिंग, थेट आयसीसीला मागणी करत म्हणाला, ‘हा’ नियम बदलाच…

On: शनिवार, ऑक्टोबर 28, 2023 10:32 AM
Harbhajan-Singh
---Advertisement---

Harbhajan Singh On Pakistan Defeat : विश्वचषक 2023 स्पर्धेतील 26व्या सामन्यात शुक्रवारी (दि. 27 ऑक्टोबर) पाकिस्तानचा पराभव झाला. 1 विकेटने दक्षिण आफ्रिकेने शानदार विजय साकारला. हा पाकिस्तानचा स्पर्धेतील सलग चौथा पराभव ठरला. हा सामना खूपच नजीकचा राहिला. यामध्ये अखेरच्या षटकात एकेवेळी सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकला होता, पण हॅरिस रौफ याच्या अखेरच्या षटकात सामन्याची दिशा बदलली. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर भारतीय माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग भडकला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला असला, तरीही सर्वाधिक चर्चा झाली, ती म्हणजे पंचांच्या खराब निर्णयाची. अशात पाकिस्तानच्या पराभवानंतर दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने आगपाखड केली आहे. त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत आयसीसीकडे मोठी मागणी केली आहे.

हरभजनची पोस्ट
अशातच हरभजनने ट्वीट करत लिहिले की, “पंचांच्या खराब निर्णयामुळे पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला. आयसीसीने हा नियम बदलला पाहिजे. जर चेंडू स्टम्पवर लागत आहे, तर बाद आहे. पंचांनी बाद देऊ किंवा नाबाद, याने काही फरक पडत नाही. अशात तंत्राचा काय फायदा आहे?”

हरभजन संतापण्यामागील कारण काय?
झालं असं की, दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 46व्या षटकात 2 वादग्रस्त निर्णय पाहायला मिळाले, ज्यावरून खळबळ माजली. हॅरिस रौफ याच्या पाचव्या चेंडूवर पंचांनी आधी वाईड निर्णय दिला. याविषयी चाहत्यांचे म्हणणे आहे की, चेंडू शम्सीच्या पायावरून जात होता. तसेच, रौफच्या अखेरच्या चेंडूवर हाय व्होल्टेज ड्रामा झाला. पंचांनी शम्सीला पायचीत बाद दिले नाही.

यावेळी रिव्ह्यूमध्ये दिसले की, चेंडू आऊटसाईड, इम्पॅक्ट इन लाईन आणि विकेट्सला लागत होता. मात्र, पंचांचा निर्णय असल्यामुळे शम्सी नाबाद राहिला. जर शम्सी बाद झाला असता, तर हा सामना पाकिस्तानने जिंकला असता. यादरम्यान रौफसह संपूर्ण संघाचे चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते. अखेरीस शम्सी आणि केशव महाराज यांनी 11 धावांची भागीदारी केली. तसेच, महाराजने विजयी चौकार मारत सामना जिंकून दिला. यावरून हरभजनने राग व्यक्त केला.

हेही वाचा-
‘आमच्यासाठी दरवाजे…’, सलग चौथ्या निराशाजनक पराभवानंतर Babar Azam भावूक, सहकाऱ्यांबद्दल केलं मोठं विधान
चेपॉकवर रंगला वर्ल्डकपचा पहिला थ्रिलर! रोमांचक सामन्यात द. आफ्रिकेची पाकिस्तानवर मात, महाराज ठरला हिरो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---