आयसीसीने बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) वनडे रँकिंग जाहीर केली. यामध्ये भारतीय संघासोबतच दोन स्टार खेळाडूंनी अव्वलस्थान पटकावले. त्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या नावाचाही समावेश होता. मात्र, सिराजने दावा केला आहे की, वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी असण्याचा त्याला फरक पडत नाही. मात्र, त्याने असे विधान का केले आहे, हे सविस्तर जाणून घेऊयात…
सिराजचे मोठे विधान
मोहम्मद सिराज वनडे विश्वचषक 2023 (Mohammed Siraj ODI World Cup 2023) स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने 8 सामन्यात 5.23च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 10 विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीमुळे मोहम्मद सिराज आयसीसी वनडे रँकिंग (Mohammed Siraj ICC ODI Rankings) गाजवत अव्वलस्थानी विराजमान झाला. मात्र, त्याला अव्वलस्थानी असण्याचा फरक पडत नाही. खरं तर, त्याचे लक्ष्य भारताला विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब मिळवून देणे आहे.
आयसीसीशी बोलताना सिराज म्हणाला, “प्रामाणिकपणे बोलायचं झालं, तर मी मागील काही काळासाठी अव्वलस्थानी होतो, त्यानंतर पुन्हा खाली गेलो. आकड्यांचा मला फरक पडत नाही. भारताने विश्वचषक जिंकावा लक्ष्य हे आहे. हेच संघाचे आणि माझेही लक्ष्य आहे.”
संघासाठी करायचंय चांगलं प्रदर्शन
पुढे बोलताना मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) म्हणाला की, “मला आशा आहे, माझे प्रदर्शन भारतासाठी चांगले राहील. फक्त हेच महत्त्वाचे आहे. मला या संघाचा भाग असण्याचा आणि विश्वचषकात असे प्रदर्शन करण्याचा खूप अभिमान होत आहे. मी या संघासोबत खूप खुश आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, या संघाने आपल्या प्रत्येक सामन्यात चांगले प्रदर्शन करावे.” याचा व्हिडिओ आयसीसीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/Cza6BozvgYp/?utm_source=ig_embed&ig_rid=fa15e02b-5a20-4dce-9228-2a817b61b411
श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी
खरं तर, यावर्षीच्या सुरुवातीला सिराजने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही धमाकेदार प्रदर्शन केले होते. त्यामुळेच त्याने आयसीसीच्या गोलंदाजी रँकिंगमध्ये अव्वलस्थान मिळवले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध 9 विकेट्स घेतल्या. तसेच, 3 सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला होता. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या. (world cup 2023 indian pacer mohammed siraj statement on icc odi no 1 ranking)
हेही वाचा-
कर्णधार बनायला तयार नव्हता रोहित, गांगुलीने ‘ती’ अट घालताच दिला होकार, ‘दादा’चा खुलासा
सेहवागच्या पोस्टने सोशल मीडियावर माजवली खळबळ; म्हणाला, ‘पाकिस्तान जिंदा…’