---Advertisement---

वनडे वर्ल्डकपचा प्रोमो पाहून आयसीसीवर भडकले पाकिस्तानी चाहते; म्हणाले, ‘आमच्या बाबरला…’

On: शुक्रवार, जुलै 21, 2023 4:42 PM
Babar-Azam
---Advertisement---

यावर्षीच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान वनडे विश्वचषक 2023 खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी खूपच उत्सुक आहेत. अशातच या स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एक प्रोमो शेअर केला आहे. मात्र, हा प्रोमो पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींच्या गळ्याखाली उतरला नाही. त्यांनी या प्रोमो व्हिडिओबाबत संताप व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?
आयसीसीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे पाकिस्तानी चाहते नाराज आहेत. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) हा दिसला आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या व्हिडिओत भारत-पाकिस्तानचे एक भावनिक दृष्य आहे. प्रत्येक क्रिकेट संघ हा व्हिडिओत दिसत आहे. भारत आणि इंग्लंड या संघाचे अनेक स्टार क्रिकेटपटू दिसत आहेत. आत्तापर्यंत झालेल्या वनडे विश्वचषकाची एक छाप देखील यात दाखवली आहे. यामध्ये आनंद आणि निराशा या भावनादेखील दिसत आहेत.

मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) या व्हिडिओमध्ये नसल्याने पाकिस्तानी क्रिकेट चाहते संताप  व्यक्त करत आहेत. आयसीसी ही फक्त भारत आणि इंग्लंड या दोन संघासाठी आहे, असा आरोप देखील केला आहे. बाबर सध्या वनडे क्रिकेट क्रमवारीतील अव्वल क्रमाकांचा फलंदाज आहे. तरीही बाबर व्हिडिओमध्ये कुठेच दिसत नाहीये. तसेच, बाबरसोबतच इतर पाकिस्तानी खेळाडूही दिसत नसल्याचे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे.

ट्विटरवर अनेक युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, “शाहीनला विकेट घेताना दाखवण्याव्यतिरिक्त आयसीसीने पाकिस्तानी खेळाडूची नकारात्मक बाजू दाखवली आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “या व्हिडिओत एका जागी शादाब खानच्या चेंडूवर षटकार लावताना दिसत आहे. तसेच, दुसरीकडे वहाब रियाज याची धुलाई होत आहे.” भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याआधीच पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
WI vs IND । ‘हे’ आहे शार्दुलला बाहेर बसवण्याचं कारण, समोर आली महत्वाची माहिती
नारायणच्या फिरकी गोलंदाजीचा अमेरिकेत राडा, स्टार फलंदाजाचा पहिल्यांदाच सामना करताना दाखवला तंबूचा रस्ता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---