भारतात खेळल्या जात असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होऊन आता 6 दिवस झाले आहेत. यादरम्यान एकूण 8 सामने खेळले गेले. सर्व संघांनी किमान एक सामना तरी खेळला आहे. यादरम्यान काही संघ खूपच खराब कामगिरी करत आहेत, तर काहींनी उच्च दर्जाचे प्रदर्शन केले आहे. अशात मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. या सामन्यांनंतर विश्वचषक 2023च्या गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.
दिवसातील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघात झाला, तो इंग्लंडने 137 धावांनी जिंकला. तसेच, दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने 6 विकेट्सने जिंकला. अशाप्रकारे इंग्लंड आणि पाकिस्तान या विजयी संघांना गुणतालिकेत चांगला फायदा झाला.
खरं तर, इंग्लंडचा हा विश्वचषकातील दुसरा सामना होता. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात इंग्लंड संघ न्यूझीलंड 9 विकेट्सने पराभूत झाला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि 137 धावांच्या फरकाने बांगलादेशला नमवत विजयाचं खातं खोललं. दुसरीकडे, पाकिस्तान संघाचाही हा दुसराच सामना होता. विशेष म्हणजे, पहिल्या सामन्यातही पाकिस्तानने नेदरलँड्सचा 81 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेला 6 विकेट्सने नमवले. या विजयानंतर पाकिस्तान संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला.
न्यूझीलंड अव्वलस्थानी कायम
विश्वचषकातील पहिला सामना 9 विकेट्सने जिंकताच न्यूझीलंडचा नेट रनरेट +2 पेक्षाही जास्त झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यातही नेदरलँड्सला 99 धावांनी धावांनी पराभूत करत गुणतालिकेतील अव्वलस्थान काबीज केले. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांचे दोन विजयामुळे प्रत्येकी 4 गुण आहेत.
My prediction/My wish, the top four teams of this point table will be the four semi finalists in the same order….😕
#INDvsPAK#PAKvsSL#CWC23 pic.twitter.com/2Y7iGfxiGO— Fiaz Aswad (@FiazAswad) October 10, 2023
इंग्लंड पाचव्या स्थानी
दक्षिण आफ्रिका संघाने अद्याप एकच सामना खेळला असून त्यांनी श्रीलंकेविरुद्ध मिळवलेल्या 102 धावांच्या विजयामुळे गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानी आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेविरुद्ध विश्वचषकातील विक्रमी 428 धावसंख्या उभारली होती. या सामन्यात आफ्रिकेच्या 3 फलंदाजांनी शतक ठोकले होते. त्यात क्विंटन डी कॉक, रासी व्हॅन डर ड्युसेन आणि एडेन मार्करम यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त भारतीय संघ एक सामन्यातील विजयानंतर 2 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या, तर इंग्लंड गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी 2 गुण आहेत. (world cup 2023 points table after pak vs sl 8th match read here)
हेही वाचा-
‘भारतीय खेळाडूंना…’, विराट-नवीन वादाविषयी अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे विधान जिंकेल 140 कोटी भारतीयांचे मन
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर बाबर आझमची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही तर सुरुवातीच्या…’