आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानला 62 धावांनी पराभूत केले. हा ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील सलग दुसरा विजय ठरला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने सलामीवीरांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर 50 षटकात 9 विकेट्स गमावत 367 धावा चोपल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाच्या नाकी नऊ आल्या. संघावर 45.3 षटकात 305 धावांवर सर्व विकेट्स गमावण्याची नामुष्की ओढवली. यावेळी पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाकडून आधी फलंदाजी करताना डेविड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांच्यात 259 धावांची भागीदारी झाली. वॉर्नरने 163, तर मार्शने 121 धावांची शतकी खेळी साकारली. त्यानंतर गोलंदाजी करताना ऍडम झम्पा (4 विकेट्स) आणि मार्कस स्टॉयनिस (2 विकेट्स) यांनी शानदार गोलंदाजी करत पाकिस्तानी खेळाडूंना त्रास दिला. या सामन्यानंतर विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) फेरबदल झाला. चला तर जाणून घेऊयात…
ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानी
खरं तर, पाकिस्तान संघाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेल्या पराभवामुळे खूपच नुकसान झाले. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान संघ चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरला. पाकिस्तानने आतापर्यंत 4 सामने खेळले असून त्यात त्यांना 2 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. पाकिस्तानचे सध्या 4 गुण आहेत, तर ऑस्ट्रेलियाने विजयासह चौथा क्रमांक पटकावला. ऑस्ट्रेलियानेही 4 सामने खेळून त्यात 2 पराभव आणि 2 विजय मिळवले आहेत. मात्र, चांगल्या नेट रनरेटच्या आधारे ऑस्ट्रेलिया संघ 7व्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी पोहोचला.
Look at point table chutiye pic.twitter.com/fRvU4dS9Mg
— sam (@SamSamrancho465) October 21, 2023
दुसरीकडे, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी न्यूझीलंड संघ असून त्यांनी 4 सामन्यात 8 गुण मिळवले आहेत. तसेच, भारतीय संघही 4 सामन्यात 8 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. कारण, न्यूझीलंडचा नेट रनरेट +1.923 आहे, तर भारताचा नेट रनरेट +1.659 इतका आहे. तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका असून त्यांचे 4 गुण आहेत. याव्यतिरिक्त इंग्लंड संघ सहाव्या स्थानी घसरला आहे. बांगलादेश संघ सातव्या, नेदरलँड्स आठव्या, अफगाणिस्तान नवव्या आणि श्रीलंका संघ 10व्या स्थानी कायम आहे. श्रीलंकेने एकही सामना जिंकला नाहीये. (world cup 2023 points table australia moves to fourth position and pakistan on this spot after aus vs pak 18th match read)
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजयानंतर गगनाला भिडला कॅप्टन कमिन्सचा आनंद; म्हणाला, ‘बाबर आणि इफ्तिखार…’
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत होताच बाबरने वाचला चुकांचा पाढा; म्हणाला, ‘त्याचा कॅच सोडला, तर तो तुम्हाला…’