श्रीलंका संघाला गुरुवारी (दि. 2 नोव्हेंबर) भारताकडून विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला तब्बल 302 धावांनी पराभवाचा धक्का दिला. श्रीलंकेला या सामन्यात पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत. त्यांचा डाव अवघ्या 55 धावांवर संपुष्टात आला. या लाजीरवाण्या पराभवानंतर श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि समालोचक रसेल अर्नाल्ड आपले खोटे अश्रू पुसताना दिसला. यादरम्यानचा व्हिडिओही त्याने सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 357 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघ अवघ्या 19.4 षटकात फक्त 55 धावांवर सर्वबाद झाला. या पराभवामुळे श्रीलंकेच्या विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत. दुसरीकडे, भारतीय संघ (Team India) उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला.
माजी खेळाडू आणि समालोचकाची पोस्ट व्हायरल
भारताविरुद्ध लाजीरवाणा पराभव होताच श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि समालोचक रसेल अर्नाल्ड (Ressel Arnold) याने ट्विटरवर (एक्स) एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो नाटकीय अंदाजात सामन्याच्या निकालाविषयी प्रतिक्रिया देत आहे. रसेल अर्नाल्ड याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझा सामन्याचा रिव्ह्यू.” यावेळी त्याने ‘#Indvsl’ आणि ‘#Cwc23’ या दोन हॅशटॅग्जचाही समावेश केला. या व्हिडिओत रसेल आपले खोटे अश्रू पुसताना दिसत आहे.
My match review #Indvsl #Cwc23 pic.twitter.com/9eFbAUS5he
— Russel Arnold (@RusselArnold69) November 2, 2023
किती सामने बाकी?
श्रीलंका संघाचे वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 7 सामने झाले आहेत. आता त्यांना फक्त 2 सामने खेळायचे आहेत. श्रीलंका संघाचा या विश्वचषकातील पुढील सामना बांगलादेशविरुद्ध 6 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. तसेच, स्पर्धेतील त्यांचा अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध 9 नोव्हेंबर रोजी बंगळुरीच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (world cup 2023 russel arnold gives speechless match review after india win by 302 runs against sri lanka)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नेपाळ संघ 2024च्या टी20 वर्ल्डकपसाठी पात्र
नवाबांच्या शहरात नेदरलँड्सने जिंकला Toss, विराटशी भांडण संपवणारा खेळाडू अफगाणी ताफ्यातून बाहेर