वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा वर्षाच्या शेवटी भारतात खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठीची जोरदार तयारी सुरू आहे. स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मात्र, त्यापूर्वी विश्वचषकाची ट्रॉफी जागतिक दौऱ्यावर (वर्ल्ड टूर) आहे. या दौऱ्यांतर्गत विश्वचषकाची ट्रॉफी भारतासह 18 देशांमध्ये जाणार आहे. विश्वचषक ट्रॉफीचा हा दौरा 27 जून रोजी भारतापासू सुरू झाला आणि 14 जुलैपर्यंत भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी ही ट्रॉफी जाणार आहे.
अशातच विश्वचषकाची ट्रॉफी (World Cup Trophy) भारताचा केंद्रशासित प्रदेश लडाखच्या लेह शहरात पोहोचली आहे. लेह येथील पँगाँग तलाव आणि शांती स्तूप (Shanti Stupa) येथेही ट्रॉफी नेण्यात आली. यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
पँगाँग तलाव आणि शांती स्तूपला पोहोचली विश्वचषकाची ट्रॉफी
आयसीसी नुकतेच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आयसीसी विश्वचषक ट्रॉफी लडाखमध्ये नेली. पँगाँग तलाव आणि शांती स्तूपच्या जवळ विश्वचषकाच्या ट्रॉफीचा नजारा पाहायला मिळत आहे. चाहते विश्वचषकाच्या ट्रॉफीच्या या सुंदरतेचे कौतुक सोशल मीडियावर करत आहेत.
https://www.instagram.com/reel/CubQQUGxtVR/?utm_source=ig_embed&ig_rid=272801af-70d7-4a79-b04f-216e24b8ceea
खरं तर, विश्वचषकाची ट्रॉफी जगातील 18 देशांचा प्रवास करून 4 सप्टेंबर रोजी पुन्हा भारतात परतणार आहे. दुसरीकडे, भारतात पोहोचल्याच्या एक महिन्यानंतर 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे खेळला जाईल. दुसरीकडे, भारतीय संघाविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना 8 ऑक्टोबरला खेळला जाईल. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान असेल. हा सामना चेन्नई येथे पार पडेल. तसेच, 15 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्दी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ आमने-सामने असतील. (world cup 2023 trophy reached pangong lake and shanti stup in leh video must watch)
महत्वाच्या बातम्या-
असं कोण बाद होतं! सहकाऱ्याने अर्धशतक ठोकताच फलंदाज विचित्र पद्धतीने Run Out, सतत पाहिला जातोय Video
‘भारताने घरात खेळो किंवा बाहेर…’, कसोटी मालिकेपूर्वी विंडीजचा दिग्गज ब्रायन लाराचे लक्षवेधी विधान