टोकियो ऑलिंपिक्समधील सहावा दिवस (२८ जुलै) तिरंदाजीत भारतासाठी चांगला ठरताना दिसत आहे. महिला तिरंदाजीतील एकेरी गटात राऊंड १६ मधील सामना भारत आणि अमेरिका संघात पार पडला. या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या दीपिका कुमारीने अमेरिकेच्या १८ वर्षीय जेनिफर फर्नांडिसला ६-४ पराभूत केले आणि सामना खिशात घातला. यासह तिने उपउपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवले आहे.
या सामन्यात दीपिकाने पहिल्या सेटमध्ये २५ गुण मिळवले, तर जेनिफरने २६ गुण मिळवत सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दीपिकाने पुनरागमन करत २८ गुण मिळवले, तर जेनिफर केवळ २५ गुण मिळवू शकली. यानंतर तिसरा सामन्यात दीपिकाने बाजी मारत २७ गुण मिळवले आणि जेनिफर पुन्हा २५ गुणांवर अडकली. यानंतर चौथ्या सेटमध्ये जेनिफरने दमदार पुनरागमन करत २५ गुण मिळवले. मात्र, दीपिकाला केवळ २४ गुण मिळवता आले. असे असले, तरीही दीपिकाने पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये २६ गुण मिळवले, तर जेनिफर केवळ २५ गुण मिळवू शकली. (World No 1 Archer Deepika Kumari Won Against Jennifer Fernandez 6-4)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery
Women's Individual 1/16 Eliminations Results@ImDeepikaK marches through to the 1/8 Elimination Round recording a win against Jennifer Fernandez. #AllTheBest Deepika 👏🙌🏹🇮🇳 #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/86DSoaeFN4— Team India (@WeAreTeamIndia) July 28, 2021
तत्पूर्वी भारत आणि भूतान संघातील राऊंड ३२ च्या एकेरी सामन्यात दीपिकाने कर्माला ६-० ने पराभूत केले होते. त्यात दीपिकाने कर्माला पहिल्या सेटमध्ये २६-२३ ने पराभूत केले होते. यानंतर दुसऱ्या सेटमध्येही कर्माला आव्हान देत २६- २३ नेच धूळ चारली होती. यानंतर दीपिकाने आपल्या सर्वोत्तम कौशल्याने तिसरा सेटही २७-२४ने जिंकला होता.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?