बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात आज एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध भारत संघात आज 38 वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे.
भारताने या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज केएल राहुलची विकेट लवकर गमावली. तो शून्य धावेवरच बाद झाला. पण त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने भारताचा डाव सांभाळताना दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. पण विराट 66 धावा करुन बाद झाला.
याबरोबरच त्याने या विश्वचषकात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. विराटचे हे या विश्वचषकातील सलग पाचवे अर्धशतक आहे. तसेच कारकिर्दीतील 54 वे अर्धशतक आहे.
विराटने केले हे खास विक्रम –
#विराट ठरला इंग्लंडमध्ये सर्वाधिक वनडे धावा करणारा भारतीय. विराटने हा विक्रम करताना राहुल द्रविडच्या इंग्लंडमधील 1238 वनडे धावांना टाकले मागे. विराटच्या नावावर आता इंग्लंडमध्ये 1255 वनडे धावा.
#वनडेमध्ये सर्वाधिक 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे भारतीय –
145 – सचिन तेंडुलकर
95 – विराट कोहली
94 – राहुल द्रविड
# विश्वचषकात सलग पाचवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज –
2015 – स्विव्ह स्मिथ
2019 – विराट कोहली
#विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक सलग डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
5 – विराट कोहली – 2019*
4 – नवज्योत सिंग सिद्धू – 1987
4- सचिन तेंडुलकर – 1996
4 – सचिन तेंडुलकर – 2003
3 – मोहम्मद अझरुद्दीन – 1992
3 – सुनील गावसकर – 1987
3 – राहुल द्रविड – 1999
3 – युवराज सिंग – 2011
3 – रोहित शर्मा – 2019
#विश्वचषकात सलग पाच डावात अर्धशतकी खेळी करणारा विराट पहिलाच कर्णधार.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंड विरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या शमीचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश
–या भारतीय गोलंदाजांनी घेतल्या आहेत विश्वचषकातील एका सामन्यात ५ विकेट्स
–राखीव क्षेत्ररक्षक रविंद्र जडेजाने घेतला जेसन रॉयचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ






