भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) माऊंट माऊंगनुई येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. आता त्याच्याविषयी अशी काही आकडेवारी समोर येत आहे, जी पाहून त्याची फ्लॉप कामगिरी लक्षात येते. चला तर जाणून घेऊयात रिषभ पंतने नेमकी कोणती खराब कामगिरी केली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील दुसऱ्या टी20 सामन्यात केन विलियम्सन (Kane Williamson) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि ईशान किशन (Ishan Kishan) हे सलामीवीर आले होते. यावेळी पंतची गाडी रुळावरून उतरली, तर किशन चांगल्या लयीत पुढे निघून गेला.
रिषभ पंत यावेळी 13 चेंडूत फक्त 6 धावा करून तंबूत परतला. या धावा करताना त्याने 1 चौकारही मारला होता. पंत मागील काही स्पर्धा आणि मालिकांपासून मोठी खेळी करता आली नाहीये. अशात त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना कमीत कमी 50 डावांमध्ये सर्वात खराब स्ट्राईक रेट असणाऱ्या फलंदाजांमध्ये रिषभ पंत अव्वलस्थानी आला आहे.
Judged beautifully by Tim Southee and Pant goes for 6! 👏
IND 36/1 (5.1) Follow play LIVE on @sparknzsport and @TodayFM_nz in NZ or with @PrimeVideoIN in India #NZvIND pic.twitter.com/04CsUOxOfa
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 20, 2022
पंतने कमीत कमी 50 टी20 डाव खेळताना 125.77च्या खराब स्ट्राईक रेटने धावा चोपल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी एमएस धोनी (MS Dhoni) आहे. धोनीने भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कमीत कमी 50 डाव खेळताना 126.13च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. या यादीतील तिसरे नाव शिखर धवन (Shikhar Dhawan) याचे आहे. धवनने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कमीत कमी 50 डाव खेळताना 126.36च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना सर्वात खराब स्ट्राईक रेट असणारे खेळाडू (कमीत कमी 50 डाव)
125.77- रिषभ पंत*
126.13- एमएस धोनी
126.36- शिखर धवन
रिषभ पंत याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 65 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यातील 55 डावात फलंदाजी करताना त्याने 22.70च्या सरासरीने आणि 125.94च्या स्ट्राईक रेटने 970 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. नाबाद 65 ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम कामगिरी आहे. (Worst T20I SR for India Rishabh Pant Top in the list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20 WC: सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाचे कारण बॉलिंग नाहीतर बॅटिंग, इंग्लंडच्या खेळाडूचे चकित करणारे विधान
क्रिकेट इतिहासातील ‘तीन दिग्गज’; ज्यांनी आपली कारकीर्द विनाकारण लांबवली