---Advertisement---

“बीसीसीआयने विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्याचा विचार करावा”, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे मत 

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 10:52 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. ही मालिका भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जिंकत ऑस्ट्रेलिया संघावर ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर चार सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर कौतुकाचा वर्षाव झाला. यानंतर आता इंग्लंडचे माजी खेळाडू माइकल वॉन म्हणाले की बीसीसीआयने विराट कोहली ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्याचा विचार करावा.

भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या कमजोर संघाला सोबत घेवून ऑस्ट्रेलियाच्या मजबुत संघाला त्याच्याच देशात पाणी पाजले. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या या नेतृत्व कौशल्याने सर्वच प्रभावित झाले आहेत. त्यामुळे आता क्रिकेट पंडित म्हणत आहे की, ज्या प्रकारे अजिंक्य रहाणेने आपल्या कमजोर संघाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया नमवले, त्यामुळे भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली याच्यावर दबाव वाढला आहे.

इंग्लंड संघाचे माजी खेळाडू माइकल वॉन यांनी ट्विट करताना लिहले आहे की, “मी बीसीसीआयमध्ये असतो, तर अजिंक्य रहाणेला नेतृत्व देण्याचे पसंत केले असते, आणि विराट कोहली एक फलंदाज म्हणून खेळवणे पसंत केले असते. यामुळे भारत जगात अजूनही जास्त धोकादायक ठरला असता. अजिंक्य रहाणे खूपच चाणाक्ष कर्णधार आहे.”

माइकल वॉन शिवाय भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सुद्धा अजिंक्य रहाणेच्या शानदार स्वभावाची प्रशंसा केली. दिलीप वेंगसरकर आइएएनएस सोबत बोलतांना म्हणाले, “तो शांत आहे. त्याने मेलबर्न मध्ये शतक लगावले, जेव्हा भारत संकटात होता आणि त्या प्रदर्शनाने मनोबल वाढवण्याचे काम केले. इतर खेळाडूंनी सुद्धा शानदार कामगिरी केली. तसेच ऑस्ट्रेलिया सुद्धा एक शानदार संघ आहे.”

दिलीप वेंगसरकर पुढे म्हणाले, “त्याचे गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षण सजवणे सुद्धा प्रभावशाली होते. फलंदाजांना बाद करण्याची रणनिती होती. संघातील निम्म्या पेक्षा जास्त खेळाडू गाबा येथील सामन्याला निवडण्यासाठी उपलब्ध नव्हते. तरी ही त्याने चांगल्या प्रकारे नेतृत्व केले.”

कसोटी सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणेला भारतीय संघाचे नेतृत्व करायला मिळेल, जेव्हा भारतीय संघ मालिकेत 0-1 अशा फरकाने पिछाडीवर होत. तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एॅडलेड येथे सामना झाल्यानंतर पालकत्व रजेवर मायदेशी परतला. त्यानंतर भारतीय संघातील बर्‍याच खेळाडूंना दुखापत झाली होती. त्यामुळे अजिंक्य रहाणेने स्वत: पुढाकार घेत मेलबर्न येथील सामन्यात शतकी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा सामना सिडनीत खेळला गेला. तो सामना अश्विन आणि विहारी यांच्या अतुलनीय कामगिरीने भारतीय संघाने हा सामना अनिर्णीत राखला. त्यांनंतर चौथा कसोटी ब्रिस्बेन येथे खेळला गेला. या सामन्यात शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि, रिषभ पंत या खेळाडूंच्या धडाकेबाज कामगिरीने भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर मालिका सुद्धा 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली.

महत्वाच्या बातम्या:

आयएसएल २०२१ : सुपर सब विल्यम्सच्या गोलमुळे एटीके मोहन बागान विजयी

ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या घातक खेळाडूंचे पुनरागमन

म्हणून रिषभ पंतचे वडील आपल्या मुलाच्या छातीवर बांधायचे उशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---