---Advertisement---

गुजरातने दिला दिल्लीला पराभवाचा धक्का! प्ले-ऑफ्ससाठी जायंट्सच्या आशा कायम

---Advertisement---

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये गुरुवारी (16 मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स असा सामना खेळला गेला. एलिमिनेटरमध्ये जागा मिळवण्याच्या उद्देशाने दिल्लीचा संघ या सामन्यात उतरलेला. मात्र, स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी खेळत असलेल्या गुजरातने शानदार सांघिक खेळ दाखवत 11 धावांनी विजय साजरा केला. ऍश्ले गार्डनर हीने अष्टपैलू खेळ दाखवत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातची सलामीवीर सोफिया डंकली केवळ चार धावा करून माघारी परतली. मात्र, त्यानंतर लॉरा वॉल्वर्ट व हरलीन देओल यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी 49 धावांची भागीदारी केली. हरलीन 31 धावा करत माघारी परतली. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऍश्ले गार्डनरने सुरुवातीपासूनच आक्रमण केले. दुसरीकडे, वॉल्वर्टने आपले स्पर्धेतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. तिने 57 धावांची खेळी केली. गार्डनरने अखेरपर्यंत नाबाद राहत 33 चेंडूत 51 धावा केल्या.

विजयासाठी मिळालेल्या 148 भावांचे आव्हान मिळाल्यानंतर शफाली वर्मा दुसऱ्या षटकात बाद झाली. कॅप्सीने आक्रमक 22 धावा काढल्या. कर्णधार मेग लॅनिंगही 18 धावांच्या पुढे जाऊ शकली नाही. जेमिमा रॉड्रिग्ज, तानिया भाटिया व जेस जॉन्सन अपयशी ठरल्याने दिल्लीचा संघ अडचणीत सापडला होता. मरिझान कापने 36 धावा करत दिल्लीच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र, ती  दुर्दैवीरित्या धावबाद झाली. अखेरीस अरुंधती रेड्डीने संघाला विजयाची मिळवून देण्यासाठी शर्थीच प्रयत्न केले. मात्र, विजयासाठी 13 धावांची गरज असताना ती बाद झाली. अखेर गार्डनरने पूनम यादवला बाद करत संघाला विजय मिळवून दिला.

(WPL 2023 Gujarat Giants Beat Delhi Capitals By 11 Runs Ashley Gardner Laura Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विन-जडेजा की अक्षर? WTC फायनलमध्ये कोणाला मिळणार जागा? वरिष्ठ खेळाडूने दिले उत्तर
शोएब अख्तरचे ‘हे’ विधान चर्चेत, जाणून घ्या आधार कार्डविषयी काय म्हणाला पाकिस्तानी दिग्गज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---