भारतीय महिला संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिला वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये 2.60 कोटी रुपये मिळाले. सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडलेल्या डब्लूपीएलच्या या लिलावात महिला खेळाडूंवर फ्रँचायझींकडून पैशाची उधळण झाल. यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या डब्लूपीएल (महिला आयपीएल) मध्ये एकूण पाच संघ खेळणार आहेत. यूपी वॉरिअर्स संघाने मोठी रक्कम खर्च करून दीप्तीला संघात सामील केले.
बीसीसीआय मागच्या काही वर्षांपासून महिला आयपीएल आयोजित करण्याच्या विचारत होते. यावर्षी अखेर या स्पर्धेला सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरिअर्स या संघांनी सोमवारी मुंबईत आयोजित खेळाडूंच्या लिलावात पाण्यासारखा पैसा खर्च केला. प्रत्येक फ्रँचायझीला त्यांचा संघ खरेदी करण्यासाठी 12 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी होती. अशात योग्य खेलाडूंवर पैसे खर्च करणेही तितकेच महत्वाचे होते. दीप्ती शर्मा () हिने मागच्या 2014 साली भारतीय महिला क्रिकेट संघासाठी पदार्पण केले आणि आतापर्यंत अनेक महत्वपूर्व सामन्यांमध्ये मॅच विनर राहिली आहे.
https://www.instagram.com/p/ComSXBGjIgf/?utm_source=ig_web_copy_link
दीप्ती शर्मा हिने भारतीय संघासाठी आतापर्यंत 80 वनडे आणि 88 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये दीप्तीने अनुक्रमे 1891 आणि 914 धावंचे योगदान दिले आहे. गोलंदाजी विभागात तिने वनडे क्रिकेटमध्ये 91, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 97 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये दीप्तीने 2021 साली पदार्पण केले आणि आतापर्यंत फक्त दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे. कसोटीमध्ये तिच्या नावावर 152 धावा आणि 5 विकेट्सची नोंद आहे.
दरम्यान, बीसीसीआय सोमवारी आयोजित केलेल्या या लिलावात भारतीय साघाची कर्णदार हसमनप्रीत कौर () हिला मुंबई इंडियन्सने 1.80 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. भारताची सलामीवीर फलंदाज स्म्रिती मंधानावर मात्र आरसीबीने मनोसोक्त पैसे खर्च केले. स्म्रितीला संघात घेण्यासाठी आरसीबीने 3.40 कोटी रुपयांची बोली लावली. ऑस्ट्रेलियाच ऍश्ले गार्डनरला खरेदी करण्यासाठी गुजरात जायंट्सने 3.20 कोटी रुपये खर्च केले. इथरही अनेक खेळाडू कोट्यावधी रुपयांमध्ये विकल्या गेल्या. (WPL Auction UP Warriors team spent Rs 2.60 crores to get Deepti Sharma in the team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती
स्म्रिती मंधानाची रॉयल एन्ट्री! तब्बल 3 कोटी 40 लाखाची बोली घेत बंगळूरु संघाच्या ताफ्यात दाखल