पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगट अपात्र ठरल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. अवघं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलंय. 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात विनेशचा मुकाबला अमेरिकेची कुस्तीपटू सारा हिच्याशी होणार होता.
विनेशच्या अपात्रतेनंतर देशाचे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत निवेदन देत आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं आहे. याआधी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी विनेशला प्रोत्साहन दिलं. पंतप्रधान मोदींनी विनेश ‘चॅम्पियन खेळाडू’ असल्याचं म्हटलंय. तर, विरोधकांनी हा विनेश विरोधात कट असल्याचा संशय व्यक्त केलाय.
या सगळ्यात आता आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (UWW) नियमांमध्ये बदल करण्याची मागणीही जोर धरत आहे. विनेश अशाप्रकारे बाहेर पडल्यानंतर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि सहा वेळाचा विश्वविजेता अमेरिकन कुस्तीपटू जॉर्डन बरोज यानं नियमांत बदल करून विनेशला रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे. त्यानं ‘X’ वर पोस्ट शेअर करून विनेशला पाठिंबा दिला.
जॉर्डननं पोस्टमध्ये विनेशला रौप्यपदक देण्याची मागणी केली आहे. याशिवाय त्यानं UWW ला काही नियमांत बदल करण्याबाबत सुचवलं आहे. जॉर्डननं पोस्टमध्ये लिहिलं,
(1) दुसऱ्या दिवशी वजनात 1 किलोपर्यंत सूट मिळावी.
(2) वजन मोजण्याची वेळ 8.30 वरून वाढवून 10.30 करण्यात यावी.
(3) भविष्यात जर फायनलमध्ये पोहचलेला कुस्तीपटू वजन कमी करण्यात अपयशी ठरला, तर त्याला पराभूत घोषित करण्यात यावं.
(4) सेमीफायनलमधील विजयानंतर दोन्ही कुस्तीपटूंचं पदक निश्चित करण्यात यावं, जरी एखादा पैलवान दुसऱ्या दिवशी वजन कमी करण्यात अपयशी ठरला तरी. सुवर्ण पदक त्याच खेळाडूला मिळावं, ज्यानं दुसऱ्या दिवशी वजन कमी ठेवलं असेल.
(5) विनेश फोगटला रौप्य पदक देण्यात यावं.
Proposed Immediate Rule Changes for UWW:
1.) 1kg second Day Weight Allowance.
2.) Weigh-ins pushed from 8:30am to 10:30am.
3.) Forfeit will occur in future finals if opposing finalist misses weight.
4.) After a semifinal victory, both finalists’ medals are secured even if…
— Jordan Burroughs (@alliseeisgold) August 7, 2024
हेही वाचा –
जेव्हा विनेशप्रमाणेच अडकली होती मेरी कोम, अवघ्या 4 तासांत कमी केलं होतं 2 किलो वजन!
विनेश फोगटला अपात्र ठरवणारा कुस्तीचा नियम काय आहे? पैलवानाचं वजन कसं केलं जातं? जाणून घ्या
काल 2 किलो जास्त होतं विनेशचं वजन! रात्रभर प्रयत्न केले, व्यायाम केला; तरीही 100 ग्रॅम राहिलंच