भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा मागच्या काही महिन्यांमध्ये अनेकदा चर्चेत आला. एका पत्रकाराकडून त्याला धमकावणारे मेसेज आल्याचे त्याने सांगितले होते. नंतर बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि त्या पत्रकारावर दोन वर्षांची बंदी देखील घातली. या प्रकरणानंतर साहाने आता बंगाल संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्वतः याची पुष्टी केली आहे की, तो आता राज्याच्या संघासाठी खेळणार नाहीये.
माध्यमांतील वृत्तानुसार, वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) म्हणाला की, “माझ्यासाठी देखील हा खूप निराश करणारा अनुभव होता की, बंगालकडून एवढे वर्ष खेळल्यानंतर मला अशा प्रसंगामधून जावे लागत आहे. हे खूप दुःखदायक आहे की, लोकं अशा प्रकारच्या कमेंट करतात आणि आपल्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित करतात. एका खेळाडूच्या रूपात मी यापूर्वी कधीच अशा कोणत्याच गोष्टीचा सामना केला नव्हता, पण आता हे झाल्यावर मी यातून पुढे जाऊ इच्छितो.”
“आता मी माझ्या मनाची तयारी केली आहे की, बंगाल संघासाठी खेळायचे नाहीये. मी फोनवरून क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांना याबाबतीत माहिती दिली आहे. परंतु मी स्वतः जाऊन त्यांना भेटेल आणि ही प्रक्रिया पूर्ण करेल,” असेही साहाने पुढे बोलताना सांगितले.
दरम्यान, साहाने २००७ साली बंगालच्या संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर मागच्या १५ वर्षांपासून तो याच संघासाठी खेळत आला आहे. बंगाल संघात साहाच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित होत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याच कारणास्तव रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात देखील साहाने सहभाग घेतला नाही. हंगामातील दुसऱ्या टप्प्यात साहा बंगालसाठी खेळणार, अशा बातम्या समोर आल्या होत्या, पण आता साहाने त्या सर्व चुकीच्या ठरवल्या आहेत. आयपीएल २०२२चा विजेता संघ गुजरात टायटन्ससाठी साहाने नुकतेच अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये करोडोंची बोली लागल्यानंतर खरंच तेवढे पैसे खेळाडूंच्या खात्यात जमा होतात का?