इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडच्या साउथँप्टनमध्ये खेळवला जाणार आहे. तसेच भारतीय फलंदाजांना स्विंग होणारे चेंडू खेळणे कठीण जाते. अगदी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे देखील स्विंग होणाऱ्या चेंडूवर लवकर माघारी परततात. तर, न्यूझीलंड संघात चेंडू स्विंग करणारे जगप्रसिद्ध गोलंदाज आहेत.
त्यातही भारतीय संघाचा विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा याला इंग्लंडच्या मैदानावर कसोटी क्रिकेटचा अनुभव फार कमी आहे. त्यामुळे भारतीय संघापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
रोहित शर्माच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये ३ दुहेरी शतक आहेत. तसेच टी-२० क्रिकेटमध्येही तो किती विस्फोटक फलंदाजी करू शकतो, हे अपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु त्याला इंग्लंडमध्ये खूप कमी कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे.
त्याने आतापर्यंत एकूण ३८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ४६.२९ च्या सरासरीने २६१५ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याला ७ शतक आणि १२ अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे. रोहितने २०१९ मध्ये कसोटीत सलामीला फलंदाजी करताना ९२.६६ च्या सरासरीने तब्बल ५५६ धावा चोपल्या होत्या. तसेच यावर्षी देखील कसोटीत त्याने ४७४ धावा केल्या आहेत.
त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी कितीही चांगली असेल तरीदेखील मुख्य बाब म्हणजे त्याने इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकच कसोटी सामना खेळला आहे. हा सामना त्याने साउथँप्टनच्या मैदानावरच खेळला होता. यात त्याला अवघ्या ३४ धावा करण्यात यश आले होते. या खेळपट्टीवर चेंडू जास्त स्विंग होतो आणि न्यूझीलंड संघाकडे चेंडू स्विंग करणारे जगप्रसिद्ध गोलंदाज आहेत. त्यामुळे रोहित शर्माच्या चिंतेत वाढ होऊ शकते.
परंतु या खेळपट्टीवर जर तो सेट झाला, तर तो नक्कीच मोठी धावसंख्या उभारू शकतो. कारण त्याने साउथँप्टनच्या मैदानावर १ कसोटी आणि २ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याला एकूण १५७ धावा करण्यात यश आले आहे. तसेच ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथीचा त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी खेळत असताना नेट्समध्ये आणि आयपीएल सामन्यांध्ये अनेकदा सामना केला आहे. त्यामुळे रोहित शर्मा एकदा चांगला सेट झाला की तो भारतीय संघाला मोठ्या धावा उभारण्यात मदत करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
आजच्याच दिवशी सीएसकेला धुळ चारत मुंबई इंडियन्स ठरली होती आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम
मुंबई इंडियन्सचा स्टार पोलार्डची पत्नी दिसते खूपच सुंदर, पेशाने आहे मोठ्या बिजनेसची मालकीण
मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी स्वत:च्या राष्ट्रीय संघाला नकार देणारा कायरन पोलार्ड