---Advertisement---

‘पाच मिलियन लोकसंख्येच्या देशाने, १.४ बिलीयनच्या देशाला धूळ चारली,’ वॉनचा भारताला टोमणा

---Advertisement---

गेल्या २ वर्षांपासून चालत आलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा बुधवार रोजी (२३ जून) निकाल लागला. भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ विकेट्सने बाजी मारली. भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर आता क्रिकेट जाणकार आणि माजी क्रिकेटपटू आपआपली मत मांडताना दिसत आहे. कोणी टीकांचा वर्षाव करतो आहे तर कोणी क्रिकेटपटूंच्या चूका सांगत आहे. आता माजी इंग्लंड खेळाडू माइकल वॉन याने नेहमीप्रमाणे भारतीय संघाच्या विरोधात भाष्य केले आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड असा रंगलेल्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे खेळाडू सरस ठरले. न्यूझीलंडने सुंदर प्रदर्शन करून भारतीय संघाचा पराभव केला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात केवळ १३८ धावांची आघाडी घेतली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचे सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार केन विलीयमसन आणि रॉस टेलर यांनी नाबाद ९५ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.

यानंतर न्यूझीलंडच्या विजयाची भविष्यवाणी करणाऱ्या माजी इंग्लंड खेळाडू वॉनने भारतीय संघावर निशाणा साधला. सामना झाल्यानंतर वॉनने ट्विट करत लिहिले की, “हे क्रिकेटसाठी खूप चांगले आहे. ५ मिलियन लोकसंख्या असलेल्या देशाने १.५ बिलियन लोकसंख्या असलेल्या देशाला हरविले आहे. न्यूझीलंड या अगोदरसुद्धा विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. परंतु,आज तो जिंकला आहे. ते आता मुख्य विजेता आहेत. सगळ्या संघांनी यावर लक्ष्य द्यावे. अभिनंदन न्यूझीलंड.”

या ट्विटच्या काही तासांपूर्वी सुद्धा त्याने अजून एक ट्विट केले होते. त्यात असे लिहिले होते की, “मला वाटते, काही तासातच भारतीय समर्थकांना माझी क्षमा मागावी लागेल. मी अगोदरच गृहीत धरले होते की, न्यूझीलंड संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणार आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘ही’ एक गोष्ट शुभमन गिलला नडते, भारतीय दिग्गजाने साधला निशाणा

क्रिकेटसाठी ‘या’ खेळाडूनं दुखापतीवर दुर्लक्ष केलं, इंजेक्शन घेऊन मैदानात उतरला अन् इतिहासही रचला

भारीच! न्यूझीलंडच्या जेतेपदाची बातमी पोहोचली प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसात, ‘या’ शब्दांत गायले गुनगाण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---