पूर्ण २ वर्षांच्या कालावधीनंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८-२२ जूनमध्ये रंगणार आहे. पूर्ण क्रिकेट विश्व या सामन्यासाठी उत्सुक आहे. हा सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघ इंग्लंड मध्ये सराव करत आहे तर तिथेच न्यूझीलंड संघाने नुकताच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत करून करून दाखवून दिली आहे की अंतिम सामन्यासाठी ते किती मजबूत स्तिथीत आहे.
दुसर्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडला ८ गडी राखून पराभूत केले. यासह, न्यूझीलंड संघाने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली. त्यामुळे भारताविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला असेल. या सामन्यात न्यूझीलंडचे ६ खेळाडू भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकतात. आयसीसीतर्फे प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवेने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो त्याच्या पहिल्या मालिकेत मालिकावीर ठरला. त्याने ४ डावात ७७ च्या सरासरीने ३०६ धावा केल्या त्यात एक द्विशतक आणि एक अर्धशतक झळकावले. २०० धावा ही त्याची सर्वात मोठी खेळी होती . २९ वर्षी या खेळाडूने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले आहे आणि १४ टी२० सामन्यात ४ अर्धशतक मारले आहे. त्याचे खेळाच्या तिन्ही स्वरूपात उत्कृष्ट प्रदर्शन आहे.
रॉस टेलर मधल्या फळीतील मजबूत खेळाडू.
न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलर हा संघातील वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. सध्याच्या संघात तो भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचवेळी वेगवान गोलंदाज काइल जेमिन्सनला इंग्लंडविरुद्ध केवळ एकाच कसोटीत सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने त्या सामन्यात तीन गडी बाद केले. पण त्याच्याकडे भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी आणि खालच्या फळीत फलंदाजी करताना महत्त्वाचे योगदान देण्याची क्षमता आहे.
वेगवान गोलंदाजांची सर्वात महत्त्वाची तिकडी
न्यूझीलंडच्या संघात आत्तापर्यंत तीन वेगवान गोलंदाज, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट आणि नील वॅग्नर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या तीन खेळाडूंनी संघाला प्रथम क्रमांकावर नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. टिम साउथी आणि नील वॅग्नरने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत ७-७ गडी बाद केले. बोल्टला ६ विकेट्स घेण्यात यश आले आहे. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनेही ६ विकेट घेतल्या आणि दुसर्या कसोटीत सामनावीर ठरला. त्यामुळे हे खेळाडू भारताविरुद्धही चांगली कामगिरी करु शकतात.
महत्वाच्या बातम्या
विश्वचषकात ‘तू चल मी आलो’चा प्रसंग, इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या ४५ धावांवर गुंडाळला होता डाव
इंग्लंडवर १-०ने मात करत न्यूझीलंडचा ‘मोठा’ पराक्रम, २२ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला पूर्णविराम
‘इंग्लंडला गुंडाळलं, आता भारताचा नंबर,’ न्यूझीलंडच्या दणदणीत विजयानंतर दिग्गजाचा दावा