जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना सुरू होण्यास अवघे 4 दिवस शिल्लक आहेत. अशात या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन याने गुरुवारी (दि. 01 जून) दोन भारतीय फलंदाजांविषयी आपले मत मांडले. तो म्हणाला की, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघाला रिषभ पंत याची उणीव भासेल. याव्यतिरिक्त तो असेही म्हणाला की, भारताला यष्टीरक्षक म्हणून केएस भरत याच्या जागी ईशान किशन याला खेळण्याची संधी दिली पाहिजे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 7 जूनपासून डब्ल्यूटीसी अंतिम सामना (WTC Final) खेळला जाणार आहे. हा सामना लंडनच्या के ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जोमाने सराव करत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू मागील काही महिन्यांमध्ये सातत्याने दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यापैकीच एक रिषभ पंत (Rishabh Pant) हादेखील आहे. कसोटीत पंतची सर्वात जास्त उणीव भासली आहे.
डिसेंबर 2022मध्ये पंत एका रस्ते अपघातात गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर पंत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी, आयपीएलसह अनेक स्पर्धांमधून बाहेर पडला. आता डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातही तो खेळताना दिसणार नाहीये. हे भारतासाठी मोठे नुकसान ठरू शकते.
भारतीय संघ व्यवस्थापनाने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी केएस भरत (KS Bharat) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना ताफ्यात सामील केले आहे. खरं तर, भरतला फेब्रुवारीमध्ये झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, तिथे तो खास काही करू शकला नव्हता. तसेच, किशनने अद्याप कसोटीत पदार्पणही केले नाहीये. त्यामुळे भारतापुढे एक मोठी समस्या आहे की, यष्टीरक्षक म्हणून कोणत्या खेळाडूला संधी मिळाली पाहिजे. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) याने भाष्य केले.
तो म्हणाला की, “सध्या भारतीय संघाच्या सर्वात मोठ्या नुकसानापैकी एक रिषभ पंतचे संघात नसणे आहे. जर मी भारतीय संघाचा निवडकर्ता असतो, तर यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला संघात ठेवले असते. तो फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात चांगली कामगिरी करतो.”
किशनला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. तसेच, पंत हेच काम कसोटी क्रिकेटमध्ये करायचा. अशात या क्रिकेट जाणकाराचं मत आहे की, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये डावखुऱ्या पंतची कमतरता पूर्ण करण्यासाठी ईशान किशनला सामील केले पाहिजे. किशनने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल हंगामात एकूण 16 सामन्यात 140हून अधिकच्या स्ट्राईक रेटने एकूण 454 धावा केल्या होत्या. अशात या अंतिम सामन्यात भारतीय संघात किशन आणि भरत यांच्यापैकी कुणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (wtc matthew hayden on ishan kishan ks bharat world test championship final 2023 )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हेच आपले संस्कार! ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीने सर्वांपुढे घेतला धोनीचा आशीर्वाद, पाहा पाया पडतानाचा Video
रूटने कसोटीत रचला इतिहास! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील तिसरा फलंदाज, विराट तर लईच लांब