जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जसजसा जवळ येत आहे. तसतसे डब्ल्यूटीसी 2023-25 चे पाँइट्स टेबल अधिक रोमांचक होत आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत पुढे असल्याचे दिसून येत होते. दरम्यान, आणखी एक मोठा संघ दाखल झाला आहे. या संघाने भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी मोठ्या अडचणी निर्माण केल्या आहेत. हा संघ दुसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढे जात असल्याचे दिसत आहे.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला. परिणामी संघाने डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी संघ पाचव्या स्थानावर होता. मात्र आता संघ ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. सामन्यापूर्वी संघाची टक्केवारी 54.17 होती. आता त्यात बदल होऊन 59.25 इतकी झाली आहे.
दरम्यान दुसरीकडे भरत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचेही आयोजन करण्यात आले आहे. जिथे दोन्ही संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी पाच सामन्यांची मालिका खेळत आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत प्रथम आणि द्वितीय स्थान मिळवणारे संघच अंतिम फेरीत स्थान मिळवतात. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेला अजून तीन सामने खेळायचे आहेत. ज्यात एक सामना श्रीलंकेविरुद्ध तर दोन सामने पाकिस्तानविरुद्ध खेळवले जाणार आहेत. जर त्यांच्या संघाने तिन्ही सामने जिंकले तर भारत आणि ऑस्ट्रेलियातील एकच संघ अंतिम फेरीत जाऊ शकेल.
हेही वाचा-
“विराटसारखे स्वत:वर…” फ्लाॅप ठरलेल्या ऑस्ट्रेलिया फलंदाजांना माजी कर्णधाराने दिला सल्ला
भारतापुढे झुकला पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्राॅफीच्या हायब्रीड माॅडेलसाठी तयार
IND vs PAK; राजस्थानने खरेदी केलेला 13 वर्षीय खेळाडू पाकिस्तानपुढे ठरला फेल