जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. नजीकच्या काळात 2021 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यातही पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर कसोटी संघात आमूलाग्र बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येते. आता भारताच्या कसोटी संघातून थेट अनुभवी चेतेश्वर पुजारा यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या सामन्यात पुजाराकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, दोन्ही डावात तो या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. पुजारा मागील अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळतो. त्यामुळे तो भारतीय संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. त्याच्या या खराब कामगिरीनंतर त्याला संघातून बाहेर करण्याविषयी चाहते बोलताना दिसतायेत.
पुजारा याला संघातून बाहेर करून आता कसोटी संघात युवा यशस्वी जयस्वाल याला संधी देण्याविषयी बीसीसीआय देखील विचार करत असल्याचे समजते. जयस्वाल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावेळी स्टॅन्ड बाय म्हणून भारतीय संघाचा भाग होता. त्याला भारतीय ड्रेसिंग रूमचे वातावरण समजावे यासाठी संधी देण्यात आल्याचे सांगण्यात आलेले. असे असतानाच आता तो तिसऱ्या क्रमांकावर भारतीय कसोटी संघात फलंदाजी करताना दिसू शकतो.
जयस्वाल मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत प्रथमश्रेणी क्रिकेट खेळताना धावांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. रणजी ट्रॉफी, दुलिप ट्रॉफी तसेच इराणी ट्रॉफी या सर्व महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून शतके आली आहेत. तसेच नुकत्याच समाप्त झालेल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना त्याने 600 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
(Yashasvi Jaiswal Might Replace Cheteshwar Pujara In Indian Test Team)
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा