सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीच्या बुधवारी (13 जानेवारी) पार पडलेल्या मुंबई आणि केरळ विरुद्धच्या सामन्यात क्रिकेट रसिकांना चौकार व षटकारांची आतषबाजी बघायला मिळाली. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानावर उत्तम कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबईच्या संघाकडून 19 वर्षीय युवा यशस्वी जयस्वालने केरळचा अनुभवी गोलंदाज श्रीसंत विरुद्ध जबरदस्त खेळ केला.
त्याने श्रीसंतच्या एका षटकातील केवळ 3 चेंडूवर 16 धावा वसूल केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या डावातील सहाव्या षटकात श्रीसंतने जयस्वाल विरुद्ध गोलंदाजी केली. षटकातील दुसऱ्या चेंडूवर जयस्वालने षटकार ठोकला. यानंतरच्या तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर सलग चौकार ठोकत जयस्वालने केवळ 3 चेंडूत 16 धावा वसूल केल्या. श्रीशांतने या षटकात एकूण 18 धावा खर्च केल्या.
जयस्वाल याने या सामन्यात 32 चेंडूंचा सामना करत 40 धावा केल्या. त्याशिवाय मुंबईकडून आदित्य तरेने 42 धावा केल्या, तर कर्णधार सुर्यकुमार यादवने 38 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने 20 षटकात 196 धावा करताना केरळला 197 धावांचे आव्हान दिले. केरळकडून गोलंदाजी करताना जलज सक्सेना आणि केएम असिफने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
मुंबईने दिलेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केरळकडून युवा फलंदाज मोहम्मद अझरुद्दिनने 54 चेंडूत नाबाद 137 धावांची अविश्वसनीय खेळी करत संघाला 16 षटकांच्या आतच विजय मिळवून दिला. त्याने त्याचे शतक केवळ 37 धावात पूर्ण केले होते. त्याच्याशिवाय केरळकडून रॉबिन उथप्पाने 33 धावा आणि कर्णधार संजू सॅमसनने 22 धावा केल्या.
या स्पर्धेत मुंबईचे 2 सामन्यात सलग 2 पराभव झाले असून, केरळने 2 सामन्यात 2 विजय मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चर्चा तर झालीच पाहिजे! ३७ चेंडूत शतक करणाऱ्या अझरुद्दीनला मिळाले रोहित, रिषभच्या पंक्तींत स्थान
थोडेथोडके नाही तर तब्बल १७ षटकारांची आतषबाजी करत ‘या’ भारतीय खेळाडूने रचले वर्ल्ड रेकॉर्ड्स
ब्रिस्बेन कसोटीसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ, पुकोस्कीच्या जागेवर ‘या’ खेळाडूला संधी