न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शनिवारपासून (२६ डिसेंबर) माऊंट माउंगनुई येथे सुरू झाला. ख्रिसमसनंतर दुसऱ्या दिवशी सुरू झालेली ही कसोटी ‘बॉक्सिंग डे’ कसोटी म्हणून ओळखली जाते. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान न्यूझीलंडने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. कर्णधार केन विलियम्सनच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या दिवसाअखेर तीन बाद २२२ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. त्याचवेळी, कसोटीच्या या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शहा याच्या एका गमतीशीर प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध होतोय.
पहिल्या दिवसावर न्यूझीलंडचे वर्चस्व
न्यूझीलंडच्या माऊंट माउंगनुई येथे सुरू झालेल्या या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडने आपल्या नावे केला. प्रथम फलंदाजी करत असताना न्यूझीलंडला पहिल्याच षटकात टॉम लॅथमच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर, टॉम ब्लंडेलदेखील फार काळ टिकू शकला नाही. शाहीन आफ्रिदीने १३ धावांत हे दोन्ही फलंदाज बाद केले होते. मात्र, त्यानंतर कर्णधार विलियम्सन व अनुभवी रॉस टेलर यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १२० धावांची भागीदारी रचली. टेलर वैयक्तिक ७० धावा काढून बाद झाला. चौथ्या गड्यासाठी विलियम्सन व हेन्री निकोल्स यांनी नाबाद ८९ काढत न्यूझीलंडच्या धावसंख्येला आकार दिला. पाकिस्तानकडून तीनही बळी शाहीन आफ्रिदीने मिळवले.
आऊट होजा भूतनी के!
पहिल्या दिवसातील ७७ व्या षटकात एक गमतीशीर प्रसंग घडला. पाकिस्तानचा अव्वल फिरकीपटू यासिर शहा हे षटक टाकत होता. यासिरने पहिला चेंडू टाकल्यावर फलंदाजी करत असलेल्या हेन्री निकोल्सने कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर, यासिरच्या तोंडून “आऊट होजा भूतनी के!” असे शब्द बाहेर पडले. दिवसभर गोलंदाजी करून थकलेल्या यासिरची हतबलता या प्रसंगातून दिसून आली. यासिरच्या या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी यासिरची मजा घेत, त्याला ट्रोल केले.
https://twitter.com/7Strang_er18/status/1342713393715802112
नियमित कर्णधाराच्या अनुपस्थित खेळत आहे पाकिस्तान
नियमित कर्णधार बाबर आझम व इमाम उल हक यांच्या अनुपस्थितीत पाकिस्तान संघ या कसोटी मालिकेत उतरला. पाकिस्तानचे नेतृत्त्व मोहम्मद रिझवान करत आहे. कसोटी मालिकेआधी झालेल्या टी२० मालिकेत न्यूझीलंडने पाकिस्तानला २-१ अशा फरकाने पराभूत केले होते. कसोटी मालिकेतील दुसरा सामना ख्राइस्टचर्च येथे खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs NZ: चालू सामन्यातच अज्ञात व्यक्ती नग्न अवस्थेत घुसला मैदानात; पुढे काय झालं पाहाच
बापरे…! सिराजने वेगाने टाकलेला चेंडू आदळला ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या हेल्मेटवर अन्….






