भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडकडून उपांत्य सामन्यात पराभूत झाला. इंग्लंडने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले होते. रोहित आता 35 वर्षांचा झाला आहे. अशात असे बोलले जात आहे की, रोहित टी20 विश्वचषक 2024मध्ये भारतीय संघाचा भाग नसेल. त्याची जागा घेण्यासाठी या 3 खेळाडूंची नावे पुढे येत आहेत. कोण आहेत ते तीन खेळाडू चला जाणून घेऊया…
रोहित शर्मा (Rohit Sharma) याची जागा घेऊ शकणारे 3 खेळाडू
1. शुबमन गिल
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाकडून सलामीला फलंदाजी करणाऱ्या शुबमन गिल (Shubman Gill) हा रोहित शर्मा याची जागा घेण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. 23 वर्षीय गिलने आतापर्यंत भारतासाठी 14 वनडे आणि 11 कसोटी सामने खेळले आहेत. दुसरीकडे, त्याने 74 आयपीएल सामन्यात 32.2च्या सरासरीने 1900 धावा चोपल्या आहेत.
2. संजू सॅमसन
यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) हा सलामीवीर म्हणून भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतो. संजूमध्ये पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा कुटण्याची क्षमता आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघाकडून 16 टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 135च्या स्ट्राईक रेटने 296 धावा चोपल्या आहेत.
3. ऋतुराज गायकवाड
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत रोहित शर्मा याची जागा घेऊ शकतो. 25 वर्षीय ऋतुराजने भारताकडून आतापर्यंत 9 टी20 सामन्यात फलंदाजी केली आहे. तसेच, 36 वर्षीय आयपीएल सामन्यात 130.35च्या स्ट्राईक रेटने 1207 धावा चोपल्या आहेत.
भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान उभय संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यात आली. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर दुसरा सामना व्यवस्थित पार पडला. हा सामना भारतीय संघाने आपल्या नावावर केला. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली होती. यानंतर तिसरा सामनाही पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला. त्यामुळे ही मालिका भारताने आपल्या खिशात घातली. (youngest cricketer shubman gill sanju samson or ruturaj gaikwad can replace rohit sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध 50 आणि नाबाद 45 धावा केल्यानंतरही गिल चिंतेत, वाचा काय म्हणाला
व्हिडिओ: 36 वर्षीय धोनी आणि 24 वर्षांच्या पंड्यामध्ये लागलेली 100 मीटर शर्यत, पाहा कोण जिंकलेलं