भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून, रविवारी (२४ जुलै) झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी यजमान संघाचा २ चेंडू व २ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. हा विजय भारतासाठी देखील खास आहे. कारण, अलीकडच्या काळातील ही दुसरी मालिका आहे, जेव्हा युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीये. नियमित कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय ते दुसऱ्यांना मालिका जिंकत आहेत. यापूर्वी, भारताने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली दोन टी२० सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडचा सफाया केला होता. आता ते वेस्ट इंडिजला त्यांच्याच मायदेशात क्लीन स्वीप करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
भारताच्या बेंच स्ट्रेंथने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतच आपल्या क्षमतेचा प्रत्यय दिला होता. तेव्हाही रोहित, विराट आणि बुमराहच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी दमदार खेळ दाखवला. मालिकेतील पहिले दोन सामने गमावूनही पुढचे दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले. या मालिकेतील शेवटचा सामना रद्द झाला होता. त्यामुळे ही मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध देखील संघाने जबरदस्त खेळ दाखवत दोन्ही टी२० सामने जिंकले.
या खेळाडूंनी जिंकली मने
या दोन्ही मालिकांमध्ये मने जिंकणाऱ्या खेळाडूंत आयपीएल गाजवणाऱ्या तसेच यापूर्वी भारतीय संघासाठी सातत्याने खेळू न शकणाऱ्या खेळाडूंचा समावेश होतो. संजू सॅमसन याने आयर्लंडविरुद्ध आणि त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध अर्शधतक ठोकून आपल्याला ही नियमितपणे संधी दिली जाऊ शकते, यासाठी दावा ठोकला. मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरने वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात अर्धशतके ठोकली. तसेच, जवळपास दीड वर्षानंतर मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन केलेल्या शुबमन गिलनेही पहिल्या दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी केली. गोलंदाजीतही मोहम्मद सिराजने आपण केवळ कसोटीच नव्हेतर वनडेतही संघाचे ट्रम्पकार्ड होऊ शकतो हे सिद्ध केले.
महत्त्वाच्या बातम्या-
यादव-रविची फिरकी आता वेस्ट इंडिजला दाखवणार तारे
INDvsWI। विंडीजला हरवत ‘गब्बर’ने केली ‘कॅप्टन कुल अन् दादा’ची बरोबरी