---Advertisement---

जेव्हा ‘या’ क्रिकेटपटूने लावला होता प्रशिक्षकाच्याच गळ्याला चाकू

On: शुक्रवार, जुलै 3, 2020 5:11 PM
---Advertisement---

अनेक खेळांमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षकाचे नाते हे विळ्या भोपळ्याचे असते. काही वरिष्ठ खेळाडूंना प्रशिक्षकांनी वारंवार सूचना केलेल्या आवडत नाहीत. अशाच एका घटनेचा उलगडा पाकिस्तानचे माजी फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांनी केला आहे. त्यांनी खुलासा केला की युनूस खानने त्यांच्या गळ्याला चाकू लावला होता.

२०१४ ते २०१९ पर्यंत पाकिस्तानचे प्रशिक्षक राहिलेल्या ग्रँट यांनी ‘फॉलोइंग ऑन क्रिकेट’ पॉडकास्टवर आपला भाऊ अँडी आणि होस्ट नील मॅन्थॉर्प यांच्याशी संभाषण करताना खुलासा केला की, “मला ब्रिस्बेन मधील ती घटना आठवते की, आम्ही सकाळी नाश्ता करत होतो. मी युनूस खानला त्याच्या फलंदाजी विषयी सांगत होतो. कदाचित त्याला माझे सांगणे आवडले नाही व त्याने डायनिंग टेबलवरील चाकु माझ्या गळ्यापर्यंत आणला. शेजारी बसलेल्या मिकी आर्थर यांनी मध्यस्थी करत हा विषय संपवला”

ग्रँट ज्या घटनेचा उल्लेख करत आहेत ती घटना २०१६ मध्ये घडली होती. तेव्हा पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. त्या दौर्‍याच्या पहिल्या कसोटीमध्ये युनूस खानने ० आणि ६५ धावा केल्या होत्या तर दौऱ्याचा शेवट तिसऱ्या कसोटीमध्ये १७५ धावा करत केला होता.

ग्रँट फ्लॉवर पुढे म्हणाले,” ही घटना अनपेक्षित होती. पण हा कोचिंगचा एक भाग आहे. या प्रवासात काही आव्हाने तर येतच राहतात. मी पाकिस्तान संघासोबत कोचिंगचा आनंद लुटला. मला अजून खूप काही शिकायचे आहे.”

सध्या ग्रँट हे श्रीलंकेचे प्रशिक्षक आहेत तर पाकिस्तानकडून ११८ कसोटी सामने खेळून १०,०९९ धावा जमवणारा युनूस खान पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक आहे.

ट्रेंडिंग घडामोडी –

इंग्लंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूची प्रकृती ढासळली, पहिल्या कसोटी सामन्यातून…

क्रिकेटर असूनही मला आतंकवाद्यांच्या सेलमध्ये १६-१७ तास ‘ते’ करत होते टॉर्चर

….आणि एवढा महान क्रिकेटर श्रीनाथ सचिनची पँट घालूनच उतरला मैदानात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---