---Advertisement---

युवराज सिंग आज घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती?

On: सोमवार, जून 10, 2019 12:54 PM
---Advertisement---

भारताचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आज दुपारी साऊथ मुंबई हॉटेलमध्ये मीडियाला बोलावले आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू असणारा युवराज आयसीसीच्या मान्यताप्राप्त विदेशी टी 20 लीगमध्ये फ्रीलान्स करियरची करण्यासाठी निवृत्तीचा विचार करीत असल्याच्याही चर्चा आहेत.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकारीने म्हटले आहे की युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करत आहे.

याबद्दल एका बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले ‘तो(युवराज) बीसीसीआयशी चर्चा करेल आणि आयर्लंड आणि हॉलंडमधील जीटी 20 (कॅनडा), युरो टी 20 स्लॅम  सारख्या स्पर्धांमध्ये खेळण्याबद्दल स्पष्टता मिळवेल. त्याला या स्पर्धा खेळण्याच्या ऑफर आल्या आहेत.’

काही दिवसांपूर्वी इरफान पठाणने बीसीसीआयची परवानगी न घेता कॅरेबियन प्रीमीयर लीगच्या ड्राफ्टमध्ये त्याचे नाव दिले होते.

याबद्दल बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकारीने पीटीआयला सांगितले की ‘इरफानला ड्राफ्टमधून नाव मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. जिथे युवराजचा प्रश्न आहे, आम्हाला नियम तपासावे लागतील. जरी तो प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी तो बीसीसीआयच्या अंतर्गत टी20 चा सक्रिय खेळाडू असेल. त्यामुळे नियम तपासावे लागतील.’

37 वर्षीय युवराजने 2007 च्या टी20 आणि 2011 च्या वनडे विश्वचषक विजयात भारताकडून मोलाची कामगिरी केली आहे. युवराजने जून 2017 मध्ये आपला शेवटचा वनडे सामना खेळला आहे. त्याने 3 ऑक्टोबर 2000 रोजी वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

त्याने आत्तापर्यंत 40 कसोटी सामन्यात 1900 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेमध्ये 304 सामन्यात खेळताना 8701 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 14 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने वनडेत 111 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याचबरोबर युवराजने 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1177 धावा केल्या आहेत आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: …म्हणून कर्णधार कोहलीने मागितली स्टिव्ह स्मिथची माफी, जाणून घ्या कारण

कोहलीची खिलाडूवृत्ती! स्मिथची निंदा करण्याऐवजी चाहत्यांना सांगितले कौतुक करा, पहा व्हिडिओ

‘लाल मातीचा बादशहा’ राफेल नदालने जिंकले १२ व्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment