---Advertisement---

युवराज सिंग भारतीय संघात पुनरागमन करणार? पहा काय म्हणाला

On: रविवार, मार्च 14, 2021 3:41 PM
---Advertisement---

शनिवारी (१३ मार्च ) पार पडलेल्या इंडिया लिजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने ५६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात युवराज सिंग नावाचे वादळ आले होते. २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेतील आठवणींना उजाळा देत युवराजने रायपूर येथील शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अवघ्या २२ चेंडूत ५२ धावांची खेळी करणाऱ्या युवराजने मोठी इच्छा व्यक्त केली आहे.

युवराजने इंडिया लिजेंड्स संघासाठी खेळताना २२ चेंडूत ५२ धावा ठोकल्या. यासोबतच त्याने २ गडी देखील बाद केले. त्याने जेंडर डी ब्रुइन याच्या पहिल्याच षटकात पहिला आणि शेवटचा चेंडू वगळता चार चेंडूत सलग चार षटकार लगावले. शानदार खेळी केल्यानंतर त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

त्यानंतर त्याने म्हटले,”माझ्या मते हे वाईट नव्हते, मी जेव्हा माझ्या कारकिर्दीतील यशाच्या शिखरावर होतो, तेव्हा मी ६ चेंडूवर ६ षटकार लगावले होते. आता ४ चेंडूवर ४ षटकार ठीक आहेत. शुक्रवारी (१२ मार्च) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात पराभव झाल्यानंतर मला वाटत आहे की माझ्याकडे भारतीय संघात पुनरागमन करण्याची चांगली संधी आहे. मी मस्करी करत आहे. मी माझ्या प्रदर्शनानंतर आनंदी आहे.”

भारतीय लिजेंड्स संघाने उभा केला २०४ धावांचा डोंगर

या सामन्यात दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीला आलेला वीरेंद्र सेहवाग लवकर माघारी परतला. त्यानंतर, सचिन तेंडुलकरने महत्वपूर्ण ६० धावांची खेळी केली. तसेच एस बद्रीनाथ ४२ धावा करत रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. त्यानंतर युवराजने अवघ्या २२ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. तसेच युसुफ पठाण याने २३ धावांनी खेळी केली. तर मनप्रीत गोनीने १७ धावांचे योगदान दिले.

त्यानंतर दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला २० षटकात ७ बाद १४८ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून अँड्र्यू पुटीक(४१) आणि मॉर्ने वॅन विक(४८) यांनी चांगली खेळी केली. तसेच कर्णधार जॉन्टी ऱ्होड्सने नाबाद २२ धावा केल्या. त्याशिवाय अन्य कोणाला खास काही करता आले नाही. इंडिया लिजेंड्सकडून युसुफ पठाणने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच युवराजने २ विकेट्स आणि प्रज्ञान ओझा आणि विनय कुमारने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

इशान किशनने सांगितले खेळातील सुधारणेचे रहस्य, ‘या’ खेळाडूंना श्रेय देत म्हणाला…

किती ते दुर्दैव! विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी-पड्डीकलने खोऱ्याने काढल्या धावा, तरीही वनडेत संधी नाही

पूनम राऊतचे बहारदार शतक! ‘या’ खास विक्रमाच्या यादीत पोहोचली तिसर्‍या स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---