---Advertisement---

पराभवानंतर धवनसेनेला आणखी मोठा धक्का; चहलसह ‘हा’ खेळाडू पॉझिटिव्ह

---Advertisement---

नुकतीच तिसऱ्या टी२० सामन्याने भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सांगता झाली आहे. संघातील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने टी२० मालिकेतील निर्णायक असा तिसरा टी२० सामना ७ विकेट्सने गमावला आणि १-२ ने टी२० मालिकाही गमावली. यानंतर श्रीलंकेतून मोठी बातमी पुढे येत आहे.

भारतीय संघातील आणखी २ खेळाडू, युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याचे सांगितले जात आहे. ते दोघेही कोविड पॉझिटिव्ह कृणालच्या संपर्कात आल्याने विलगीकरणात आहेत. ईएसपीएन क्रिकइंफोने यासंदर्भात माहिती दिली आहे.

पहिल्या टी२० सामन्यानंतर भारतीय संघातील अष्टपैलू कृणाल पंड्या याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे २७ जुलै होणारा दुसरा टी२० सामना २८ जुलै रोजी खेळवण्यात आला. पंड्याच्या संपर्कात आलेल्या इतर भारतीय खेळाडूंनाही विलगीकरणात ठेवण्यात आल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२० सामन्यात बऱ्याचशा नवख्या भारतीय शिलेदारांना खेळवावे लागले होते.

२९ जुलै रोजी तिसऱ्या टी२० सामन्याने भारताचा श्रीलंका दौरा संपल्यानंतर लवकरच भारतीय संघ मायदेशी परतणार आहे. परंतु कृणालसह विलगीकरणात असलेले ८ भारतीय खेळाडू श्रीलंकेतच थांबणार आहेत. अशात आता विलगीकरणातील खेळाडूंपैकी चहल आणि गौतम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने विलगीकरणातील इतर खेळाडूंची चिंता वाढली आहे. असे असले तरीही, अद्याप बीसीसीआयने यासंदर्भात कसलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

निर्णायक सामन्यात संजू सॅमसन भोपळाही न फोडता बाद, नेटकऱ्यांनी केले भरपूर ट्रोल

टी२० मालिका विजयानंतर वैरत्व विसरुन शनाकाने दाखवला मनाचा मोठेपणा, द्रविड अन् धवनचे मानले आभार

पडीक्कलचा चौकार अडवण्यासाठी श्रीलंकेचे तब्बल ४ खेळाडू धावले चेंडूमागे, Video पाहून व्हाल लोटपोट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---