इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 56वा सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर रंगला. या सामन्यात राजस्थान संघाचा दिग्गज फिरकीपटू युझवेंद्र चहल याने खास विक्रम नावावर केला. तो अशी कामगिरी करणारा आयपीएल इतिहासातील पहिलाच खेळाडू बनला. चला तर चहलने नेमका काय विक्रम केला आहे, ते जाणून घेऊयात…
चहलचा विक्रम
झाले असे की, या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी कोलकाताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी जेसन रॉय आणि रहमानुल्लाह गुरबाज मैदानात उतरले होते. कोलकाताने रॉयच्या रुपात पहिली विकेट ट्रेंट बोल्ट याच्यातिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर 14 धावांवर गमावली. त्यानंतर दुसरी विकेट बोल्ट टाकत असलेल्या डावातील पाचव्या षटकात पहिल्या चेंडूवर आली. यावेळी गुरबाज (18) संघाच्या 29 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. यावेळी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने त्याचा काटा काढत विक्रम रचला.
चहलच्या विकेट्स
केकेआरच्या डावातील 11वे षटक राजस्थानकडून चहल टाकत होता. या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर चहलने नितीशला शिमरॉन हेटमायर याच्या हातून झेलबाद केले. नितीशला 22 धावांवर तंबूत परतावे लागले. त्यानंतर चहलने 17व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 57 धावा करणाऱ्या वेंकटेश अय्यरला ट्रेंट बोल्टच्या हातून झेलबाद केले. चहलने याच षटकातील चौथ्या चेंडूवर शार्दुल ठाकूर याला पायचीत बाद केले. विशेष म्हणजे, चहलने 19व्या षटकातील चौथ्या चेंडूवरही विकेट काढली. त्याने रिंकू सिंग याला 16 धावांवर तंबूत पाठवत चार सामन्यातील विकेट्स पूर्ण केल्या. यावेळी चहलने 4 षटके गोलंदाजी करताना 25 धावा खर्च करत 4 विकेट्स पटकावल्या. या चारही विकेट्स काढताच युझवेंद्र चहल आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज (Yuzvendra Chahal Becomes Most Wicket Taker In IPL history) बनला.
Milestone 🚨 – Yuzvendra Chahal becomes the leading wicket-taker in IPL 👏👏#TATAIPL | @yuzi_chahal pic.twitter.com/d70pnuq6Wi
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
चहलने मोडला ब्रावोचा विक्रम
चहलच्या नावावर आयपीएल इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक 187 विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. हा आकडा या हंगामात वाढू शकतो. विशेष म्हणजे, ही कामगिरी करत त्याने ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) यालाही पछाडले आहे. ब्रावोने यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक 183 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता ब्रावो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आला आहे. (Yuzvendra Chahal becomes the leading wicket-taker in IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! ऑस्कर विजेत्या The Elephant Whisperers टीमला भेटला धोनी, गिफ्ट म्हणून दिली ‘ही’ खास वस्तू
‘त्यांनी मला फोन करून…’, खराब फॉर्ममध्ये असताना टीका करणाऱ्यांबद्दल नितीश राणाचा धक्कादायक खुलासा