---Advertisement---

युजवेंद्र चहल म्हणतो, गोलंदाजी करताना या खेळाची होते मदत

---Advertisement---

भारतीय संघाने बुधवारी(5 जून) 2019 विश्वचषकाl दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 6 विकेट्सने जिंकत या  विश्वचषकाची विजयी सुरुवात केली आहे. भारताच्या या विजयात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने 4 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला होता.

चहलने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, रस्सी वॅन डर दसेन, डेव्हिड मिलर आणि अँडील फेहलुक्वायो यांच्या विकेट्स घेतल्या होत्या.

त्याला फाफ डु प्लेसिसच्या विकेट्सबद्दल विचारले असता चहल म्हणाला, ‘मी ज्याप्रकारे फाफला बाद केले ते मला आवडले. गोलंदाजी करत असताना जेव्हा मी माझे चेंडू वळवत होतो, तेव्हा मी ऑफ स्टम्पवर चेंडू टाकण्याची योजना आखली आणि त्याला तो चेंडू कळाला नाही.’

चहल हा भारताकडून क्रिकेट खेळण्याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धीबळ खेळला आहे. त्यामुळे बुद्धीबळाची त्याला क्रिकेट खेळण्यातही मदत होते, असे चहलने सांगितले आहे. तो म्हणाला, ‘बुद्धीबळाने मला संयम आणि योजना आखणे शिकवले आहे.’

‘तूम्ही जेव्हा बुद्धीबळ खेळता तेव्हा तूम्ही 15-16 चालींचा आधीच विचार करुन ठेवता. त्याप्रमाणेच जेव्हा तूम्ही फाफ सारख्या खेळाडूविरुद्ध गोलंदाजी करता तेव्हा तूम्हाला फलंदाज कोणता चेंडू खेळेल आणि खेळू शकणार नाही तसा विचार करुन गुगली टाकायची की फ्लिपर टाकायचा याची योजना आखण्याची गरज असते.’

चहलचा हा पहिलाच वनडे विश्वचषक आहे. त्यामुळे त्याने विश्वचषकाच्या त्याच्या पहिल्याच सामन्यात 51 धावांत 4 विकेट्स घेण्याची कमाल केली आहे.

त्याचबरोबर तो विश्वचषकातील पदार्पणाच्या सामन्यात भारताकडून सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मोहम्मद शमी आहे. त्याने 2015 च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याचा विश्वचषकातील पहिला सामना खेळताना 35 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची टीम इंडियाला चेतावणी

या कारणामुळे डिविलियर्सला विश्वचषकासाठी संधी दिली नाही, दक्षिण आफ्रिका बोर्डाने केला मोठा खूलासा

विश्वचषक २०१९ : …तर ख्रिस गेल आउट झाला नसता!

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment