भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगले प्रदर्शन केले. उभय संघातील एकदिवसीय मलिकेचा पहिला सामना शुक्रवारी (२२ जुलै) त्रिनिदादमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने ३ धावा शिल्लक ठेवून या सामन्यात विजय मिळवला. सामना संपल्यानंतर चहलला वाढत्या तापमानामुळे ‘शॉर्ट्स’वर क्रिकेट खेळण्याविषयी प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर चहलने एक स्पष्ट आणि मजेशीर उत्तर दिले.
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिल्या सामन्यात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने दोन विकेट्स घेतल्या. त्याने सामन्यात एकूण १० षटके गोलंदाजी केली आणि यादरम्यान ५८ धावा खर्च केल्या. सामना संपल्यानंतर चहलला प्रश्न विचारला गेला की, वाढते तापमान पाहता क्रिकेट ‘ट्राउजर’ ऐवजी ‘हाफ पॅन्ट्स’मध्ये खेळले पाहिजे का?, यावर प्रत्युत्तर देताना चहलने साफ नकार दिला.
चहल म्हणाला की, “नाही, नाही, मला असे वाटत नाही. कारण जेव्हा कधी तुम्ही मैदानावर घसरता, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या गुडघ्यांवर घसरावे लागते. हे खूप कठीण असते. माझे दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली आहे, तिथे अनेक जखमा आहेत. मला वाटते ‘फुल पॅन्ट’ आमच्यासाठी चांगले काम करत आहे.”
चहलने पुढे बोलताना असेही सांगितले की, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर सपोर्ट स्टाफकडून त्यांना चांगले समर्थन मिळत आहे. तो म्हणाले की, “प्रशिक्षक नेहमी मला समर्थन देतात. ते मला म्हणतात, युजी तू तुझ्या जमेच्या बाजूवर लक्ष केंद्रित कर. जेव्हा प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन अशा पद्धतीने तुमचा उत्साह वाढवतात, तेव्हा नेहमी मैदानात तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी तयाह असता. मी नेहमीच माझ्या जमेच्या बाजूला महत्व देत असतो.”
दरम्यान, सामन्याच्या ४५ व्या षटकात वेस्ट इंडीजच्या ब्रँडन किंगला चहलने बाद केले. चहलला जर विकेट मिळाली नसती, तर सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागू शकत होता. भारतासाठी या सामन्यात कर्णधार शिखर धवन (९७) आणि शुबमन गिल (६४) यांनी शतकीय भागीदारी केली. विजयात या दोघांच्या खेळीचा सर्वात महत्वाचा वाट राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहित-विराटचा वनडेतील पर्याय ठरणार शुबमन गिल?
भावा, विराटने टी२० विश्वचषक खेळलाच पाहिजे! भारताच्या दिग्गजाने बोलून दाखवलेच
क्रिकेटपटूंपाठोपाठ आता भारतीय पंचही होणार मालामाल! एका दिवसाचे मिळणार तब्बल इतके हजार